शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेसह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2016 00:29 IST

गरीब कुटुंबातील मुलींना हेरून त्यांना पैशाचे प्रलोभण देऊन वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका महिलेसह तिघांना पोलिसांनी अटक केली.

नागपूरच्या युवतीचा समावेश : राजगोपालाचारी वॉर्डातील प्रकारभंडारा : गरीब कुटुंबातील मुलींना हेरून त्यांना पैशाचे प्रलोभण देऊन वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका महिलेसह तिघांना पोलिसांनी अटक केली. यात नागपूरच्या २१ वर्षीय युवतीसह एका इसमाचा समावेश आहे. ही कारवाई भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड यांच्या भरारी पथकाने सोमवारला दुपारी २ वाजता राजगोपालाचारी वॉर्डातील झोपडपट्टी वसाहतीत केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.या कारवाईत पोलिसांनी वेश्या व्यवसाय करणाऱ्या सरीता नामक (४२) या महिलेसह नागपूरची २१ वर्षीय युवती व कोथुर्णा येथील अरविंद गुरव (३२) याला अटक केली. शहरातील राजगोपालाचारी वॉर्डातील शासकीय वसाहतीमागे असलेल्या झोपडपट्टी वसाहतीतील सरीता नामक ही महिला मागील १६ वर्षांपासून याठिकाणी वास्तव्याला आहे. पतीच्या निधनानंतर ही महिला दोन मुलांसह राहत आहे. दरम्यान, ती गरीब कुटुंबातील मुलींना हेरून त्यांना पैशाचे आमिष दाखवून स्वत:च्या झोपडीवजा घरातच तिने कुंटनखाना सुरू केला होता. याठिकाणी ती वेश्या व्यवसाय करीत होती. या महिलेच्या संपर्कात नागपूर येथीलही तरूणी आहेत. संपर्कातील मुलींना बोलावून दलाली करीत होती. वॉर्डातील वेश्या व्यवसायामुळे परिसरातील नागरिकांना नानाविध त्रासांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे हा प्रकार बंद करण्याची तिला अनेकांनी तंबी दिली. मात्र, तिने त्याकडे दुर्लक्ष करून हा प्रकार सुरूच ठेवला. त्यामुळे वॉर्डातील नागरिकांनी याची दोन महिन्यापूर्वी भंडारा पोलिसात तक्रार दिली होती. परंतु पोलीस येईपर्यंत त्यांना कुणी सापडत नव्हता. त्यामुळे मागावर असलेल्या लोकांनी एक मुलगी व दोन मुले या घरात जात असताना दिसताप पोलिसांना सांगितले. पोलिसांचा ताफा पोहोचण्यापूर्वी एक तरूण निघून गेला होता. दुसरा तरूण, एक मुलगी व कुंटणखाना चालविणारी महिला सापडली. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी सदर महिला, तरूणी व त्या इसमाविरूद्ध गुन्हा नोंदविला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक बंडीवार, मिलींद कोटगले, सुरज शिंदे, रेहान खान, प्रदीप गरडे, हरिशाम केंद्रे, शमा शेख यांनी केली. (शहर प्रतिनिधी)आक्षेपार्ह साहित्य आढळलेतरुणींना पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करणाऱ्या या महिलेच्या घरी पोलिसांनी धाड घातली असता दोन खोल्यांच्या या घरातील पहिल्या खोलीत सदर महिला टिव्ही बघत होती. पोलिसांनी दुसऱ्या खोलीत प्रवेश करताच त्या खोलीत तरूणी व एक व्यक्ती आक्षेपार्ह स्थितीत आढळून आले. त्यानंतर घरात तपासणी केली असता पोलिसांना अनेक आक्षेपार्ह साहित्य आढळून आले. त्याठिकाणी उत्तेजना येणारे टॅबलेटसह अन्य साहित्यांचा समावेश होता. पोलिसांना धाड घातल्याची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी केली. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाला त्यांच्या गुप्तहेराने दिली होती.