शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

लघु पाटबंधारे विभागाचे तीन उपविभाग बंद

By admin | Updated: July 17, 2016 00:21 IST

भंडारा तलावांचा जिल्हा म्हणून शासनदप्तरी नोंद आहे. तलावांच्या देखरेखीकरिता राज्य शासनाने तुमसर, मोहाडी व लाखांदूर तालुक्याकरिता स्वतंत्र उपविभाग सुरू करण्याचे आदेश दिले होते.

जलयुक्त शिवार योजनेवर प्रश्नचिन्ह : तुमसर, मोहाडी, लाखांदूरचा समावेशमोहन भोयर तुमसरभंडारा तलावांचा जिल्हा म्हणून शासनदप्तरी नोंद आहे. तलावांच्या देखरेखीकरिता राज्य शासनाने तुमसर, मोहाडी व लाखांदूर तालुक्याकरिता स्वतंत्र उपविभाग सुरू करण्याचे आदेश दिले होते. परंतु या आदेशाची आजपर्यंत अंमलबजावणी झाली नाही. परिणामी जलयुक्त शिवार व मालगुजारी तलावांच्या पुनरूज्जीवन कार्यक्रमांना खीळ बसली आहे. लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद, भंडारा येथे राज्य शासनाने तुमसर, मोहाडी व लाखांदूर येथे तीन स्वतंत्र उपविभाग सुरू करण्याचे आदेश सहा ते सात वर्षांपुर्वी दिले होते. त्या आदेशाची अंमलबजावणी अजूनपर्यंत झाली नाही. राज्य शासन जलयुक्त शिवार व मालगुजारी तलाव पुनरूज्जीवनाला उपविभागाअभावी खीळ बसली आहे. भंडारा जिल्ह्यातच मामा तलाव आहेत. भंडारा जिल्ह्यात १,१५४ मामा तलाव आहे. एका शाखा अभियंत्यावर तीन तीन तालुक्यांचा प्रभार देण्यात आला आहे. त्यामुळे प्रभावी, योग्यरित्या नियोजन करता येणे शक्य नाही.तुमसर तालुक्यासह इतर तालुक्यात पाण्याच्या पातळीत वाढ झाली नाही. तलाव अजून रिकामेच आहे. अनेक वर्षापासून मामा तलाव गाळाने भरले आहेत. देखभाल, दुरूस्ती करण्यात आले नाही. यामुळे या हंगामात हे तलाव सिंचन करण्यास असमर्थ ठरणार आहेत. कोळी बांधवांची मत्स्य शेती धोक्यात आली आहे. येथे जलसंपदा विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. विभाग मंजुरीकरिता कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात येतो. हे उपविभाग मराठवाड्यात जाण्याची शक्यता असून याकरिता हालचाली सुरू आहेत. सात वर्षापुर्वी मंजूर झालेले उपविभाग का सुरू झाले नाही हा संशोधनाचा विषय आहे. याकडे लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष कारणीभूत आहे. प्रत्येक तालुक्यात मामा तलावांची मोठी संख्या आहे. राज्यात इतकी तलावांची संख्या कुठेही नाही. शासन व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे महत्वपूर्ण तलाव शेवटची घटका मोजत आहेत. शेतकरी व मत्स्यशेती करणाऱ्याकरिता संजिवनी ठरणारे तलावांना येथे घरघर लागली आहे. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत नवीन तलव, बोळी, साठवण तलाव, मामा तलावांचे पुनरूज्जीवन करणे हेही एक शासनाचे मिशन आहे, परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.लघु पाटबंधारे विभाग अंतर्गत तुमसर, मोहाडी, लाखांदूर येथे उपविभागांना सहा ते सात वर्षापुर्वी मंजुरी देण्यात आली. हे उपविभाग सुरू करण्याकरिता भंडारा जिल्हा परिषदेने जलसंपदा विभागाकडे पत्र पाठविले आहे. जिल्हा परिषदेकडे उपविभागाकरिता कर्मचारी उपलब्ध असल्याचा अहवाल सादर केला आहे.-पी.एस. पराते, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग जि.प. भंडारा. मामा तलावांच्या दुर्लक्षामुळे शेतीला सिंचन होणार नाही, मत्स्यशेती बुडण्याची भीती निर्माण झाली आहे. -संजय केवट, संचालक, राष्ट्रीय मत्स्यजिवी सहकारी संघ, नवी दिल्ली.