भंडाऱ्यामध्ये घराची भिंत कोसळून पती-पत्नीसह मुलीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 10:12 IST2018-08-21T10:08:38+5:302018-08-21T10:12:55+5:30
घराची भिंत कोसळून पती-पत्नीसह तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना राजेदहेगावमध्ये घडली आहे.

भंडाऱ्यामध्ये घराची भिंत कोसळून पती-पत्नीसह मुलीचा मृत्यू
भंडारा : घराची भिंत कोसळून पती-पत्नीसह तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना राजेदहेगावमध्ये घडली आहे. मंगळवारी (21 ऑगस्ट) पहाटे ४ वाजताच्या सुमारास घराची भिंत कोसळली. या घटनेत मृत्यू झालेलं कुटुंब नागपूर जिल्ह्यातील निलजमधील असून शेतमजुरीसाठी काही दिवसापासून राजेदहेगाव येथे राहत होतं.
सुकरु दामोदर खंडाते (३२), सारिका सुकरु खंडाते (२८), सुकन्या सुकरु खंडाते (३) अशी मृतांची नावे आहेत. ते राजेदहेगाव येथे घर भाड्याने घेऊन राहत होते. विटामातीच्या या घराची भिंत जोरदार पावसाने मंगळवारी पहाटे कोसळली. यामध्ये त्याखाली दबून तिघांचा मृत्यू झाला.