शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

तीन तरुणांच्या अपघाती मृत्यूने लाखांदुरात शोककळा

By admin | Updated: October 25, 2014 22:35 IST

महाविद्यालयीन जीवनात पदार्पण केल्यानंतर दोन चाकी रेसींग बाईक हाताखाली असावी, अशी प्रत्येकच तरुणांची इच्छा असते. परिस्थिती नसतानाही पालक मुलांची हौस भागवित असले तरी आपल्या

लाखांदूर : महाविद्यालयीन जीवनात पदार्पण केल्यानंतर दोन चाकी रेसींग बाईक हाताखाली असावी, अशी प्रत्येकच तरुणांची इच्छा असते. परिस्थिती नसतानाही पालक मुलांची हौस भागवित असले तरी आपल्या पाल्याकडून वाहनाचा गैरवापर होत तर नाही ना? याकडे पालकांचे दुर्लक्ष होते. जीवाची पर्वा न करता भरधाव वाहने चालविण्याची पैज लावतात आणि जीव गमावतात. लाखांदूर येथील तीन तरुणांच्या अपघाती मृत्यूने पालकांनाच सजग होण्याची वेळ आली आहे. शुक्रवारला रात्री लाखांदूर येथील चंदन खत्री या तरुणाने घरची कार बाहेर काढली. त्यात चार मित्रांना बसविले. हे पाचही मित्र सायंकाळी गावात फिरले. त्यानंतर ‘धूम’ स्टाईल बाईक चालवितात तसे कार चालवायला निघाले. अंतरगावजवळ वळणावर वाहनावरुन नियंत्रण सुटल्याने त्यांची कार झाडावर आदळली. त्यातच कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव कारच्या धडकेने करंजीची दोन झाडे मुळापासून उन्मळून कोसळली. होता. या अपघातात चंदन खत्री, सौरभ धोटे, प्रदीप तोंडरे या तिघांचा मृत्यू झाला.सर्वत्र शोककळाऐन दिवाळीला अपघात घडून तीन तरुणांचा जीव गेल्याने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. सायंकाळी पानटपरीवर बसून मौजमजा करणे तर कधी केवळ पान-खर्रा खाण्यासाठी वडसा-ब्रम्हपुरीला दुचाकीने जावून सुसाट वेगाने वाहने चालविण्याचा हा छंद जीवावर बेतला. ही घटना रात्री घडल्यामुळे कुणालाही माहिती नव्हती. परंतु दिवस जसा उजाडला तशी गावावर शोककळा पसरली. आज दिवसभर गावात शोकाकूल वातावरण होते. दुपारच्यावेळी शोकाकूल वातावरणात तिघांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खासदार नाना पटोले, आमदार बाळा काशीवार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आठवड्यात पाच जणांचा मृत्यूएका आठवड्यात लाखांदूर तालुक्यात तीन अपघात झाले. यात पाच जणांना जीव गमवावा लागला तर चार जण जखमी झाले. तरुणांमध्ये सुसाट वेगाने वाहने चालविण्याचा प्रकार वाढल्याने अपघातात वाढ होत आहे. पोलीस प्रशासनाने अनेकवेळा यावर आळा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र पालकवर्गाचा असंतोष असल्याने पोलीस प्रशासन हतबल झाले आहे.मागील वर्षीही दोघांचा मृत्यू मागील वर्षी बलिप्रतिपदेच्या दिवशी लाखांदूर येथे एका कुटुंबात मुली व जावई आले होते. सकाळी फिरण्यासाठी निघाले असताना भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली होती. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे हे वळणमार्ग धोकादाय बनले आहे. (तालुका प्रतिनिधी)