लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भरधाव प्रवासी जीप उलटून झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांसह तीन जण ठार, तर सहा प्रवासी गंभीर जखमी झाले. हा अपघात तुमसर ते कटंगी राज्य मार्गावरील राजापूर येथे मंगळवारी सकाळी १०.३० वाजता घडला.अरूणा प्रकाश मोहनकर (४५) रा. तुमसर, कल्पना सरोदे (३५) रा. कवलेवाडा ता. तुमसर अशी मृतांची नावे आहेत. एकाची ओळख पटली नव्हती. मध्यप्रदेशातील बोनकट्टा येथून प्रवासी घेऊन जीप (क्र. एम.एच. ३६-४२४७) मंगळवारी सकाळी तुमसरकडे येत होती. नाकाडोंगरीजवळील राजापूर येथील वळणावर चालकाचे जीपवरील नियंत्रण गेले आणि जीप रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या भीषण अपघातात जीपमधील तीन प्रवाशी जागीच ठार झाले. तर सहा प्रवाशी गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांना घटनास्थळी धाव घेतली. जखमींना बाहेर काढून उपचारासाठी तुमसर येथे रवाना करण्यात आले. तुर्तास जखमींची नावे कळू शकली नाही. विशेष म्हणजे राजापूरच्या वळणावर आतापर्यंत अनेक अपघात होऊन अनेकांचे बळी गेले आहे.
भंडारा जिल्ह्यात जीप अपघातात तीन ठार, सहा गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 12:37 IST
भरधाव प्रवासी जीप उलटून झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांसह तीन जण ठार, तर सहा प्रवासी गंभीर जखमी झाले. हा अपघात तुमसर ते कटंगी राज्य मार्गावरील राजापूर येथे मंगळवारी सकाळी १०.३० वाजता झाला.
भंडारा जिल्ह्यात जीप अपघातात तीन ठार, सहा गंभीर
ठळक मुद्देतुमसर तालुक्याच्या राजापूरची घटना