शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

एक एकरात तीन लाखांचे कारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2016 00:32 IST

निलज खुर्द येथील महिला शेतकरी मिरा आगासे यांनी धानाची शेती परवडत नसल्यामुळे...

लोकमत शुभवर्तमान : निलज खुर्द येथील मीरा आगासे यांनी फुलविली शेतीयुवराज गोमासे करडी (पालोरा)निलज खुर्द येथील महिला शेतकरी मिरा आगासे यांनी धानाची शेती परवडत नसल्यामुळे जिल्हा बँकेतून कर्ज काढून एक एकरात ड्रिप व प्लास्टिक मल्चिंगवर कारल्याच्या पिकाची शास्त्रीय पध्दतीने लागवड केली. कारल्याचे पिक बहरुन आले आहे. एक महिन्यात तोड्यात ५५ ते ६० हजाराचे लाखांचे उत्पन्न हाती आले. उर्वरित तीन लाखांचे उत्पन्न होण्याचा अंदाज असून खर्च वजा जाता दीड ते दोन लाख रुपयांचा नफा मिळण्याची अपेक्षा असल्याचे मीराबाईनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. निलज खुर्द येथील मिरा भगवान आगासे या शेतकरी महिलेने धानाचा उत्पादन व खर्च परवडणारा नाही. मिळणाऱ्या भावात मोठी तफावत असते. त्यामुळे शेतीतील पिक पध्दतीत बदल करण्याचा मानस मिराबाईनी पती भगवान आगासे व मुलाकडे मांडला. त्यांचा विचार आधुनिक तंत्रज्ञानाचा व अधिक उत्पादन मिळवून देणारा असल्याने घरच्यांनी मदत दिली. कारल्याचे पिक तीन महिन्याचे असते. पिकांची शास्त्रीय पध्दतीने लागवड करण्यासाठी भांडवल जिल्हा बँकेने दिले. त्यातून ड्रिप व प्लास्टिक मल्चिंग बरोबर बियाणे, खत, औषधी व अन्य साहित्याची खरेदी केली. एक एकरात सिजेंटा, अंकुर व व्हिएनआर कंपनीचे ९५० ग्रॅम, किंमत ६६५० रुपयांचे बियाणे ५ फुटावर सऱ्या पाडून ड्रिप मल्चिंगवर लागवड केली. वेलिंना अधार देण्यासाठी बांबू व केनचा वापर केल्याचे मिराबाई आगासे यांनी सांगितले.असे मिळाले एकरी उत्पादनकारल्याची लागवड जुनच्या शेवटच्या आठवड्यात करण्यात आली. १० आॅगस्टपासून कारल्याच्या तोडणीला सुरुवात झाली. रोज दोन ते अडीच पोते तोडा झाला. तुमसर शहरात थोक भावात २० ते ३० रुपयाने विक्री करण्यात आली. ८ सप्टेंबर पर्यंत २० क्विंटल उत्पादन मिळाले. त्यातून ५५ ते ६० हजाराचे उत्पन्न मिळाले. डिसेंबरपर्यंत कारल्याचा तोडा होणार असून जवळपास तीन लाखाचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे.खर्चाचे बजेटलागवड ते उत्पन्न मिळण्यापर्यंत खत, बियाणे, मल्चिंग, ड्रिप, औषधी, प्लास्टिक, केन, बांबू, मजुरी, मशागत आदी व अन्य बाबींवर आतापर्यंत सुमारे एक लाखाचा खर्च आला. डिसेंबरपर्यत दिड लाखांचा खर्च अपेक्षीत आहे. उत्पन्नातून खर्च वजा जाता एक एकरात सुमारे दीड ते दोन लाखांचा शुध्द नफा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शेतीमधूनच कौटुंबिक गाडा व्यवस्थितरित्या सुरू आहे.शेतीत तंत्रज्ञानाचा उपयोग करीत यापूर्वी भाजीपाला पिके घेतले. काही भागात ऊस व धानशेतीही केली. शेतीच्या भरवशावर कुटूंब सांभाळून मुलगा पोलीस उपनिरीक्षक, मुलगी संगणक अभियंता तर लहान मुलगा ग्रॅज्युएट झाला. तंत्रज्ञानाने शेतीसाठी मुलाचा आग्रह असतो. पतीची साथ लाभते. कृषी विभागाच्या मदतीमुळे एक एकरातून लाखांचे उत्पन्न घेता आले. निसर्गाच्या दग्यामुळे शेतकऱ्यांनी परंपरागत शेतीसोबतच अन्य शेतीचा प्रयोग करण्याची गरज आहे.- मीराबाई आगासे, शेतकरी, निलज खुर्दपत्नी व मुलांच्या शेतीतील आवडीमुळे शेतीमध्ये नवनवे प्रयोग करता आले. शेतीची देखरेख व नियंत्रणाची कामे पत्नीच सांभाळते. तिच्या सहकार्यामुळेच कुटूंबाला व शेतीतून प्रगती साधता आली. अन्य शेतकऱ्यांनी सुध्दा परंपरागत पिक पध्दतीबरोर नाविण्यपुर्ण शेतीकडे वळावे, कृषी विभाग व तज्ज्ञांची मदत घेऊन उन्नती करावी. शेती प्रगत झाली तरच सर्वांची प्रगती साध्य होईल.- भगवान आगासे,शेतकरी निलज खुर्द