शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
2
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
5
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
6
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
7
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
8
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
9
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
10
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
11
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
12
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
13
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
14
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
15
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
16
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
17
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
18
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
19
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
20
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' नोटा बनावटच

By admin | Updated: September 24, 2014 23:24 IST

तुमसर रोड देव्हाडी येथे बनावट नोटा छपाई करून त्यांची इतरत्र विल्हेवाट लावण्यात आली. या प्रकरणात सहा आरोपीविरूद्ध दि.१६ रोजी नागपूर एटीएसने २५० पानांचे आरोपपत्र दाखल केले.

नाशिकचा अहवाल : ५०० व १००० च्या नोटांचा समावेशतुमसर : तुमसर रोड देव्हाडी येथे बनावट नोटा छपाई करून त्यांची इतरत्र विल्हेवाट लावण्यात आली. या प्रकरणात सहा आरोपीविरूद्ध दि.१६ रोजी नागपूर एटीएसने २५० पानांचे आरोपपत्र दाखल केले. नाशिक येथून ३ लक्ष नोटांचा अहवाल दि.२३ मंगळवारी प्राप्त झाला. यासर्व नोटा ५०० व १००० बनावट असल्याचा खुलासा केला आहे. मुंबई येथून नोटा छपाई यंत्राची तपासणी अहवालाची येथे आता प्रतिक्षा आहे.दि.२४ जुलैच्या मध्यरात्री नागपूर एटीएस पथकाने तुमसर रोड देव्हाडी येथून बनावट नोटा छपाईच्या यंत्रासह बंटी दवारे (२८) रा. गांधी वार्ड, विजय लिल्हारे (३०) नेहरू वॉर्ड व छोटू मेश्राम (३०) रा. स्टेशनटोली यांना अटक केली होती. या टोळीने नागपूर येथे नकली नोटा चलनात आणल्या होत्या. नागपूर एटीएसने सापळा रचून नागपूर येथील गणेश उर्फ उदयसिंह निमजे याला ३ लाख २२ हजार ५०० च्या बनावट नोटा जप्त करून अटक केली होती. तपासात गणेश निमजे याने बनावट नोटा तुमसर रोड देव्हाडी येथून आणल्या होत्या, असे सांगितले.तपासात चार आरोपींनी दिनेश कडू व दीपक पाठराबे यांच्या रॅकेटमध्ये समावेश असल्याची माहिती दिली. या सहा आरोपीविरूद्ध नागपूर एटीएसने दि.१६ सप्टेंबर रोजी २५० पानांचे आरोपपत्र नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. दरम्यान नागपूर एटीएसने बनावट नोटा नाशिक व नोटा छपाई यंत्र मुंबई येथे तपासणीकरीता पाठविले होते. यात नोटांचा अहवाल दि.२३ सप्टेंबर मंगळवारी प्राप्त झाला. यात ३ लाखांच्या नोटा बनावट असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. ५०० ते १००० रूपयांच्या या नोटा आहेत. आता नोटा छपाई यंत्राचा अहवाल मुुंबईवरून येणे शिल्लक आहे, अशी माहिती एटीएसचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश देसाई यांनी दिली.दि.२४ जुलै रोजी आरोपींना अटक केल्यावर आरोपींकडून प्रत्येक बिंदूवर कसून चौकशी करण्यात आली. या प्रकरणात आरोपीविरूद्ध भादंवि ४८९ (क), १२० (ब) तथा ४२० कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)