शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

तर कर्जमुक्ती हुकणार ! शेतकऱ्यांच्या 'या' हलगर्जीपणामुळे कर्जमुक्ती योजनेचा लाभ धोक्यात येण्याची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 20:26 IST

Bhandara : शेतकऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कर्जमुक्ती योजनेचा लाभ धोक्यात येण्याची चिन्हे दिसत आहेत. आधार व फार्मर आयडी नोंदणीतील त्रुटी, अपुरी कागदपत्रे आणि प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्याने अनेक पात्र लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

भंडारा : शेतकऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कर्जमुक्ती योजनेचा लाभ धोक्यात येण्याची चिन्हे दिसत आहेत. आधार व फार्मर आयडी नोंदणीतील त्रुटी, अपुरी कागदपत्रे आणि प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्याने अनेक पात्र लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करून अर्ज अंतिम करण्याचे आवाहन केले आहे. शासनाकडून कर्जनिवारणासाठी आवश्यक माहिती संकलनाचे काम वेगाने सुरू आहे.

मोहाडी तालुक्यासह विविध भागांतील थकीत कर्जदारांचा तपशील गोळा केला जात आहे. सेवा सहकारी संस्था आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमार्फत ही माहिती शासनाच्या अधिकृत पोर्टलवर नोंदवली जात आहे, तसेच कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देता येईल. परंतु अनेकांनी अद्याप आधारकार्ड, फार्मर आयडी व संबंधित कागदपत्रे संस्थांकडे जमा केलेली नाहीत. त्यामुळे माहिती अपूर्ण राहत असून ऑनलाइन प्रणालीतील नोंदणी प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत.

या विलंबाचा परिणाम भविष्यात जाहीर होणाऱ्या कर्जमाफी अथवा सहाय्य योजनांवर होऊ शकतो. शेतकऱ्यांनी वेळ न दवडता आपल्या संबंधित सेवा सहकारी संस्था किंवा बैंक शाखेत जाऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. अन्यथा दुर्लक्षामुळे शासनाच्या मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे लक्ष देणे नितांत गरजेचे झाले आहे. 

...तर नोंदणी अडणार

ज्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांनी अद्याप आधारकार्ड, फार्मर आयडी व इतर आवश्यक माहिती दिलेली नाही, त्यांनी तातडीने सेवा सहकारी संस्था किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेशी संपर्क साधावा. माहिती अपूर्ण राहिल्यास शासनाच्या पोर्टलवर नोंदणी होऊ शकणार नाही. वारंवार सांगुनही शेतकरी नोंदणी किंवा माहिती अपलोड करीत नसल्याने प्रशासनही हतबल आहे. 

"शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे त्वरित जमा करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा भविष्यातील कर्ज निवारण योजनांचा लाभ मिळण्यात बळीराजाला अडचणी येऊ शकतील."- विलास देशपांडे, सहायक निबंधक सहकारी संस्था, मोहाडी

"शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची आशा होती. फार्मर आयडी नसल्यामुळे आमच्यासारख्या छोट्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. तातडीने तालुका पातळीवर विशेष शिबिर घेऊन नोंदणी करून घ्यावी. तरच त्यांना लाभ मिळू शकेल."- भगवान चांदेवार, अध्यक्ष, भाजप तालुका, मोहाडी 

English
हिंदी सारांश
Web Title : Farmer Negligence Threatens Loan Waiver; Incomplete Documents Cause Hurdles

Web Summary : Farmer negligence risks loan waivers. Incomplete documents like Aadhaar and Farmer IDs delay registration. Authorities urge immediate correction to avoid losing benefits from government schemes. Missing the deadline could exclude farmers from debt relief programs.
टॅग्स :FarmerशेतकरीfarmingशेतीMaharashtraमहाराष्ट्र