विद्यार्थीनींकडून लादी आणि भींती पुसून घेणे पुसणे पडले महागात ! मेश्राम यांचा काढला पदभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 15:51 IST2026-03-14T15:50:02+5:302026-03-14T15:51:13+5:30

Bhandara : परिचारिकांचे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थीनींकडून आयसीयू मधील लादी आणि भींती पुसून घेणे अखेर परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या परिसेविका तसेच सफाई कर्मचाऱ्यांनाही महागात पडले.

The students' efforts to wipe the floors and walls proved costly! Meshram was removed from his post. | विद्यार्थीनींकडून लादी आणि भींती पुसून घेणे पुसणे पडले महागात ! मेश्राम यांचा काढला पदभार

The students' efforts to wipe the floors and walls proved costly! Meshram was removed from his post.

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
परिचारिकांचे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थीनींकडून आयसीयू मधील लादी आणि भींती पुसून घेणे अखेर परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या परिसेविका तसेच सफाई कर्मचाऱ्यांनाही महागात पडले. 'लोकमत'मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्ताची दखल घेऊन जिल्हा शल्य चिकीत्सकांनी शुक्रवारी तातडीने रेखा मेश्राम याचा पदभार काढला, तर, कक्षसेविका आणि सफाई कामगारांच्या पाळ्यांमध्ये तातडीने बदल केला.

'प्रशिक्षण बाजुला, भावी परिचारिकांकडून आयसीयूमध्ये सफाईची कामे ।' या मथळ्याखाली 'लोकमत' मध्ये ठळकपणे वृत्त प्रकाशित होताच शुक्रवारी एकच खळबळ उडाली. मागील तीन दिवसांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात या संदर्भात चर्चा सुरु होत्या. माध्यमांनी यावर प्रकाश टाकताच रुग्णालय प्रशासन खडबडून जागे झाले. या घटनेशी संबंधित व्हिडीओ मागवून जिल्हा शल्य चिकीत्सक संदीपकुमार गजभीये यांनी तातडीने अवलोकन केले. या संदर्भात चौकशीचे आदेश त्यांनी दोन दिवसांपूर्वीच दिले होते. त्याचे अहवालही मागविले त्या अहवालामध्ये यंत्रणेतील दोष पुढे आल्याने त्यांनी रेखा मधुसदन मेश्राम यांचा पदभार काढला. त्यांच्याकडे परिचर्या प्रशिक्षण केंद्राचा प्रभार होता. तसेच, घटनेच्या दिवशी त्या अनुपस्थित होत्या, असेही चौकशी अहवालात स्पष्ट झाल्याने ही कारवाई करण्यात आली.

चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी असलेले कक्षसेवक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणार्थ्यांना काम सांगण्याचे आदेश नसतानाही त्यांनी विद्यार्थ्यांकडून काम करवून घेतल्याचेही चौकशीत पुढे आले. त्यामुळे त्यांच्या पाळींमध्ये बदल करण्यात आला आहे. विद्यार्थीनींच्या महिला वसतीगृहात दोन महिला कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवाही वर्ग करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. 

सजेशन बॉक्स लावणार

येथील प्रशिक्षणार्थी विद्यार्थीनींची कोणत्याही अधिकाऱ्याबद्दल, येथील व्यवस्थेबद्दल अथवा अन्य कारणाबद्दल तक्रार असल्यास सजेशन बॉक्समध्ये सूचना किनवा तक्रारी टाकाव्या, असेही जाहीर करण्यात आले. यामुळे किती विद्यार्थीनी निर्भयपणे तक्रारी मांडण्यास पुढे येणार, हे लवकरच दिसणार आहे.

Web Title : छात्राओं से फर्श साफ़ कराने पर अधिकारी को हटाया गया।

Web Summary : लोकमत की रिपोर्ट के बाद, एक अधिकारी को हटा दिया गया क्योंकि प्रशिक्षु नर्सों को आईसीयू फर्श साफ करने के लिए मजबूर किया गया था। जांच में कर्मचारियों द्वारा प्रोटोकॉल उल्लंघन का पता चला, जिसके कारण शिफ्ट में बदलाव हुआ। छात्रों की शिकायतों के लिए सुझाव पेटी लगाई जाएगी।

Web Title : Forcing students to clean floors leads to official's removal.

Web Summary : Following a Lokmat report, an official was removed after trainee nurses were forced to clean ICU floors. An investigation revealed protocol violations by staff, leading to shift changes. Suggestion boxes will be installed for student complaints.