शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

एक लाख नागरिकांच्या सुरक्षेचा भार ४० पोलिसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2022 5:00 AM

लाखनी ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ६१ गावे समाविष्ट असून, सुमारे एक लाख लोकसंख्या आहे. भंडारा तालुक्यातील ५ व साकोली तालुक्यातील ३ गावांचाही लाखनी ठाण्यात समावेश आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी लाखनी शहर, मुरमाडी, गडेगाव, पोहरा, पिंपळगाव, सालेभाटा अशा ६ बिटांची निर्मिती करण्यात आली आहे. बिटांची जबाबदारी पोलीस हवालदार किंवा पोलीस नायकांवर सोपविण्यात आली आहे.

चंदन मोटघरेलोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने लाखनी ठाण्यांतर्गत येणाऱ्या ६१ गावांतील नागरिकांच्या सुरक्षेचा भार केवळ ४० पोलिसांवर आला आहे. कार्यरत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदारी आल्याने कामाचा ताण वाढला आहे. लाखनी ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ६१ गावे समाविष्ट असून, सुमारे एक लाख लोकसंख्या आहे. भंडारा तालुक्यातील ५ व साकोली तालुक्यातील ३ गावांचाही लाखनी ठाण्यात समावेश आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी लाखनी शहर, मुरमाडी, गडेगाव, पोहरा, पिंपळगाव, सालेभाटा अशा ६ बिटांची निर्मिती करण्यात आली आहे. बिटांची जबाबदारी पोलीस हवालदार किंवा पोलीस नायकांवर सोपविण्यात आली आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शांतता व सुव्यवस्था राखणे, जातीय दंगली घडू नयेत, यासाठी प्रयत्न करणे, कार्यक्षेत्रात घडणाऱ्या घटनांचे गुन्हे दाखल करून तपास करणे, अवैध धंद्यांचे उच्चाटन करणे, सराईत गुन्हेगारांवर नजर  ठेवणे, अती महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा करणे, गुन्ह्यांचा तपास करणे, तथा शासनाने सोपवून दिलेली कर्तव्य बजावणे, ही प्रमुख कामे आहेत. मात्र, कर्तव्य बजावण्यात अधिक वेळ खर्ची होत असल्याने मानसिक ताण सहन करावा लागतो. दिलेली जबाबदारी वेळेत पार पाडली नाही तर अधिकाऱ्यांकडून बोलणी खावी लागतात. त्यासाेबतच कौटुंबीक जबाबदारीही असतेच. त्यामुळे अकारण मनस्ताप सहन करावा लागतो.

मानसिक तणाव- लाखनी ठाण्याच्या हद्दीतून राष्ट्रीय महामार्ग जातो. केव्हा अपघात होईल याचा नेम नसतो. त्यामुळे २४ तास कर्तव्य बजावावे लागते. त्याचा मानसिक  त्रास सहन करावा लागतो. अधिक वेळ कर्तव्य बजावण्यात जात असल्यामुळे कुटुंबालाही वेळ देता येत नाही. त्यामुळे कौटुंबीक कलह नित्याचीच बाब झाली आहे.

६० पदे मंजूर, २० रिक्त- लाखनी ठाण्यात पोलीस निरीक्षक एक, सहाय्यक निरीक्षक एक, पोलीस उपनिरीक्षक चार आणि पोलीस कर्मचारी ६० अशी पदे मंजूर आहेत. त्यातील ४० पदे भरलेली असून, २० पदे रिक्त आहेत. मंजूर पदांपैकी ३५ टक्के कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. ४० कर्मचाऱ्यांपैकी तीन पाळीत स्टेशन डायरीसाठी नऊ कर्मचारी, न्यायालयीन कर्तव्य दोन, चालक तीन, साप्ताहिक सुट्टीत दररोज तीन ते चार कर्मचारी असतात. उर्वरित २५ पोलीस कर्मचाऱ्यांना सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. 

 

टॅग्स :PoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे