शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

हातमाग विणकरांसाठी ‘कापड स्पर्धा’

By admin | Updated: March 3, 2016 00:45 IST

मनुष्याच्या अंगात वेगळे काही करण्याची कला असते. मात्र त्या कलेला प्रोत्साहन मिळत नसल्याने उत्तम कारागीर समाजासमोर त्याची कला सादर करू शकत नाही.

उत्कृष्ट कारागिरांना पुरस्कार : उपनिबंधक सहकारी संस्थेचा उपक्रमभंडारा : मनुष्याच्या अंगात वेगळे काही करण्याची कला असते. मात्र त्या कलेला प्रोत्साहन मिळत नसल्याने उत्तम कारागीर समाजासमोर त्याची कला सादर करू शकत नाही. जिल्ह्यात हातमाग उद्योग आहे. मात्र त्याला शासनाकडून पाहिजे त्याप्रमाणात प्रोत्साहन मिळत नसल्याने हातमाग केंद्र केवळ नावापुरते उरले आहेत. अशा उत्तम कारागिरांसाठी कापड निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या वतीने ही स्पर्धा भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्यालयाच्या सभागृहात शनिवारला आयोजित करण्यात आली आहे. यातून जिल्ह्यातील हातमाग कापड निर्मिती करणाऱ्या कलावंतांना त्यांनी तयार केलेले परंपरागत हातमाग कापड ज्यात साड्या, लुगडी, लुंगी, खनाळी, धोतर आदी तर अपरंपरागत हातमाग कापड उत्पादनात टॉवेल, चादर, शर्टिंग कोटिंग पडद्याचे कापड, मफलर, शॉल, वॉलहॅगिंग आदी तयार केलेले साहित्य या स्पर्धेत आणू शकतात. सन २०१५-१६ मध्ये हातमाग कापडाच्या उत्तम नमुन्यासाठी स्पर्धा व बक्षीस योजनेंतर्गत हातमाग कापड स्पर्धा घेण्याचे सूचित केले आाहे. त्या अनुषंगाने भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील हातमाग सहकारी संस्था, खासगी व इतर विणकरांना या स्पर्धेत भाग घेता येईल. उत्कृष्ट कापडांच्या निर्मितीसाठी कारागिरांना दोन्ही विभागातील विजेत्यांना वेगवेगळी रोख बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या हातमाग विणकर स्पर्धकांनी नगामध्ये असणारे असलेले कापड कमीत कमी १ नग व मीटरमधील नमुने कमीत कमी २ मीटर आपले संपूर्ण नाव, मोबाईल नंबर व पत्ता तसेच कापडाचे विवरण किमतीमध्ये द्यावे. त्याचप्रमाणे हातमाग विणकरांनी निवासी पुराव्यासह व कापड वाणासह स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहावे. सदर स्पर्धेकरिता निवड समिती गठित करण्यात आली असून बक्षीसपात्र नमुन्याचे बक्षीस जाहीर करणे, एकही नमुना बक्षीसपात्र न ठरविणे किंवा बक्षिस विभागून देण्याबाबतचा अंतिम निर्णय निवड समितीचा राहील. या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या हातमाग विणकर स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये नाव नोंदणीकरिता जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था भंडारा यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन वरिष्ठ पर्यवेक्षक (हातमाग) संदीप निर्वाण यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)