शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

विद्यार्थ्यांना शिकविणे म्हणजे शेती पिकविणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2016 00:34 IST

आज घराघरात शिक्षण हे महत्वाचे आहे. जो शिकला तो टिकला. विद्यार्थ्यांचे आई-वडील समजून विद्यार्थ्यांना शिक्षकांनी योग्य ज्ञानाचे धडे शिकवावे.

रामचंद्र अवसरे यांचे प्रतिपादन : शैक्षणिक साहित्य प्रदर्शनीजवाहरनगर : आज घराघरात शिक्षण हे महत्वाचे आहे. जो शिकला तो टिकला. विद्यार्थ्यांचे आई-वडील समजून विद्यार्थ्यांना शिक्षकांनी योग्य ज्ञानाचे धडे शिकवावे. जसे पिकांना खत पाणी देऊन लहानाच मोठा करतो, त्याचप्रकारे ज्ञानरुपी खतपाणी विद्यार्थ्यांच्या मनात रुजवून सुसंस्कारीत बनविणे म्हणजे शेती पिकविणे होय, असे प्रतिपादन आमदार रामचंद्र अवसरे यांनी केले.जिल्हा परिषद शाळा केंद्र ठाणाद्वारे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम ज्ञानरचनावाद तंत्रस्नेही शाळा शिक्षणाची वारी अंतर्गत शिक्षणाचा प्रचार व प्रसार होण्याच्या दृष्टीने गावची शाळा आमची शाळा या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा पेवठा येथे शैक्षणिक साहित्य प्रदर्शनी व पालखीचे समारोपप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष राजेश डोंगरे हे होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रेमदास वनवे, चंद्रप्रकाश दुरुगकर, के. झेड. शेंडे, देवराव पडोळे, एस. एच. तिडके, अमित वसाणी,चोलाराम गायधने, सुरेश मेश्राम, निलकंठ हटवार, कविता पाटील, रविंद्र मेश्राम केंद्र प्रमुख वसंत साठवणे उपस्थित होते.राजेश डोंगरे म्हणाले, आज बोटावर मोजण्याइतकेच शिक्षक आदर्श ठरत आहे. शिक्षक भ्रष्ट व्यभीचारी झाला तर विकासाचे मार्ग खुंटतो. मराठी शाळांना शैक्षणिक वारी काढण्याची वेळ येऊन ठेपली आहे. याची कारणमिमांसा करावे. विद्यार्थी-पालक -शिक्षक यांची योग्य सांगळ असली तर, सामाजिक शैक्षणिक उत्थान होऊ शकतो. याकरिता शिक्षण हेच प्रबोधनाचे योग्य साधन आहे.तत्पूर्वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखली या ठिकाणाहुन बारा गावादरम्यान काढण्यात आलेल्या शिक्षणाची वारीचे जिल्हापरिषद शाळा पेवठा येथे सभेत रुपांतर झाले. उपस्थित पाहुण्यांनी जिल्हा परिषद शाळा राजेदहेगाव व खराशी येथील शिक्षिका आमना सयैद व आशा लाहाणे यांनी तयार केलेल्या शैक्षणिक साहित्याची प्रत्यक्ष पाहणी करीत चर्चा केली. असर फाऊंडेशन कला संस्कृती कलापथकद्वारे कार्यक्रम सादर करण्यात आले. सायंकाळी सरगम ग्रुपद्वारे 'आज की शाम आपके नाम' या सदराखाली संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. संचालन मुकेश लामकाने यांनी केले. आभार अशोक भुरे यांनी मानले. (वार्ताहर)