शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशन काळात शिक्षकांच्या सहली होणार बंद

By admin | Updated: September 16, 2014 23:32 IST

राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी त्यांच्या संघटनांच्या अधिवेशनासाठी आठवडाभरासाठी बाहेर सहलीवर जायचे आणि शाळा ओस पडायच्या, यावर इंधन आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने एका

अशोक पारधी - पवनी राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी त्यांच्या संघटनांच्या अधिवेशनासाठी आठवडाभरासाठी बाहेर सहलीवर जायचे आणि शाळा ओस पडायच्या, यावर इंधन आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने एका निर्णयानुसार बरेच निर्णय घातले असून दीर्घसुटीमध्येच अधिवेशन घेण्याचा फटका जाहीर केलेला आहे.शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्या व अशैक्षणिक कामातून मुक्तता करण्यासाठी संघटना स्थापन केलेल्या आहेत. राज्यस्तरारील अधिवेशनासाठी जाताना दिवस अधिवेशन प्रवास कालावधी धरून संपूर्ण आठवडाभर शिक्षक शाळेच्या बाहेर राहायचे व शाळा ओस पडायच्या. शाळा बंद राहिल्यामुळे विधिमंडळात शासनावर प्रखर टिका व्हायची. यावर उपाय म्हणून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे नवीन शासन निर्णय निर्गमित करून शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनाचे अधिवेशन दीर्घ सुटीमध्येच आयोजित करण्याचे निर्देश दिलेले आहेत.राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित, कायम विना अनुदानित, प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालये चालविली जात असून अंदाजे ६ लक्ष शिक्षक तर ७४ हजार शिक्षकेत्तर कर्मचारी आहेत. संघटनांनी आयोजित केलेल्या अधिवेशनाला उपस्थित राहण्याकरीता शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना काही अटीचे पालन करावे लागणार आहे. संघटना मान्यता प्राप्त असावी. अधिवेशन अशैक्षणिक दीर्घ सुटीमध्ये कालावधीमध्येच घेण्यात यावे. अधिवेशनाचे आयोजनासाठी शासनाची पुर्वपरवानगी घ्यावी. अधिवेशनात अशैक्षणिक कामे घेवू नयेत. अधिवेशनात शिक्षण क्षेत्राशी संबंधित प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या समावेश असावा. अधिवेशन कालावधीमध्ये कोणताही वित्तीय लाभ सवलती मिळणार नाहीत. राज्यस्तरीय अधिवेशनकरीता कालावधी ३ दिवस तर जिल्हास्तरीय अधिवेशनाचा कालावधी २ दिवसापेक्षा अधिक असू नये. जिल्हा अधिवेशनाकरीता प्रवासाचा कालावधी अनुज्ञेय राहणार नाही. अधिवेशन कालावधीत शिक्षकांच्या उपस्थितीचे प्रमाणपत्र देणे संघटनेवर बंधनकारक असून त्याशिवाय उपस्थिती ग्राह्य धरली जाणार नाही, अशा अटी असलेल्या शासन निर्णयामुळे अधिवेशनातील शिक्षकांची उपस्थिती कमी होणार असल्याचे बोलल्या जात आहे.