Talathi office alert for protest | तलाठी कार्यालयासाठी आंदोलनाचा इशारा

तलाठी कार्यालयासाठी आंदोलनाचा इशारा

ठळक मुद्देबिनाखी गावात समस्या : वेळेवर काम होत नसल्याने गावकरी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : बिनाखी गावात अनेक समस्या असताना शासनस्तरावर सोडविण्याचे प्रयत्न होत नाही. गावाचे नावाने असणारे तलाठी कार्यालय गावात स्थानांतरणाकरिता गावकरी आंदोलन करणार आहेत. या आशयाचे निवेदन त्यांनी वरिष्ठांना दिले आहे.
तुमसर बपेरा राज्य मार्गावरील दीड हजार लोकवस्तीचे बिनाखी गावात तलाठी कार्यालय आहे. परंतु गावात कार्यालय नाही. गोंदेखारी बसस्थानक परिसरात कार्यालय भाड्याचे घरात सुरु आहे. परंतु गावात कार्यालय स्थानांतरीत करण्यात येत नाही. गावात या कार्यालयाकरिता जागा आणि घर उपलब्ध करण्यास गावकरी तयार असताना महसूल विभागाची यंत्रणा ऐकायला तयार नाही. या कार्यालयात कुणाचे नियंत्रण नसल्याने बंद असल्याचे दिसून येत आहे. ५० हून अधिक शेतकऱ्याचे जमिनीचे फेरफार वर्षभरापासून अडली आहेत. यामुळे शेतकरी त्रस्त झाली आहे. तलाठी गैरहजर राहत असल्याने शेतकऱ्यांची कामे होत नाही. यामुळे कार्यालय गावात स्थानांतरीत करण्याची ओरड सुरु झाली आहे. याच गावात स्मशानभूमीचा विकास अडला आहे. स्मशानभूमीत जाण्याकरिता रस्ता नाही. पावसाळ्यात अडीच फुट पाण्यातून प्रेतांना न्यावे लागत आहेत. यामुळे अडचणीचा सामना गावकºयांना करावा लागत आहे. स्मशानभूमीत एकही सुविधा नाही. लोकप्रतिनिधी या गावाचे विकास कार्याकडे निधी उपलब्ध करताना हेतुपुरस्सररित्या दुर्लक्ष करीत असल्याने संताप आहे. लोकप्रतिनिधींना अनेक निवेदन गावकऱ्यानी दिली आहेत. परंतु गावकऱ्याना आश्वासनाची खैरात वाटण्यात येत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या समस्या जैसे थे आहेत. परंतु कुणी गांभीर्याने घेत नाही. गावातील समस्या सोडविण्याकरिता तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र मेश्राम व संतोष बघेले यांनी निवेदन दिले असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

गावात स्मशानभूमीचा विषय गंभीर आहे. रस्ता नाही. सुविधांचा वानवा आहे. यामुळे गावकरी नाराज असून समस्या सोडविली पाहिजे.
-अनिता बघेले, सरपंच बिनाखी.

Web Title: Talathi office alert for protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.