शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग आरक्षण सोडतीकडे नजरा

By admin | Updated: June 30, 2016 00:36 IST

नोव्हेंबर महिन्यात नगर परिषदेची निवडणूक येऊन ठेपली असून कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण निघणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

नगर परिषद निवडणूक : २ जुलै रोजी होणार चित्र स्पष्टभंडारा : नोव्हेंबर महिन्यात नगर परिषदेची निवडणूक येऊन ठेपली असून कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण निघणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. २ जुलै रोजी होणाऱ्या आरक्षण सोडतीनंतर भंडारा, तुमसर, पवनी शहरातील चित्र स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक असून आरक्षण आणि प्रभाग रचनेनंतर वातावरण तापायला सुरूवात होणार आहे. भंडारा नगर परिषदेत ३३ नगरसेवक राहणार आहे. यात १७ महिला आणि १६ पुरूष राहतील. ३२ वॉर्डाचे १६ प्रभाग राहतील. तुमसर नगर परिषदेत २३ नगरसेवक राहणार आहे. यात १२ महिला आणि ११ पुरूष राहतील. २२ वॉर्डाचे ११ प्रभाग राहतील. पवनी नगर परिषदेत १७ नगरसेवक राहणार आहे. यात ९ महिला आणि ८ पुरूष राहतील. १६ वॉर्डाचे ८ प्रभाग राहतील. प्रत्येक प्रभागात दोन जागांपैकी एक जागा महिला आरक्षित राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये एक महिला व एक पुरुष दिसणार असून लोकसंख्येनुसार एका प्रभाग तीन उमेदवारांचा राहणार आहे. प्रभागाच्या आरक्षणासह प्रभागाची निश्चिती २ जुलै रोजी सकाळी ११ वाजता त्या-त्या नगर परिषद कार्यालयात होणार आहे. ५ ते १४ जुलैपर्यंत हरकती व सूचना मांडता येणार आहे. त्यावर २७ जुलैपर्यंत जिल्हाधिकारी सुनावणी करतील. ही सुनावणीची कार्यवाही २ आॅगस्टपर्यंत विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे. १० आॅगस्टपर्यंत अंतिम होईल. १७ आॅगस्टला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतरच प्रभागामध्ये निवडणूक तयारीला वेग येणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)नगराध्यक्षपद आरक्षणाकडे लक्षयावर्षी थेट नगराध्यक्ष निवडणूक होणार असून नगराध्यक्षांचे आरक्षण ही शासनस्तरावरची बाब असल्यामुळे ते केव्हा घोषित होते, याकडे राजकीय पदाधिकाऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. नगराध्यक्ष पदासाठी सर्वच राजकीय पक्षाकडून मोठ्या प्रमाणावर मोर्चेबांधणी सुरू आहे. परंतु आरक्षण निघाल्यानंतरच राजकीय समिकरण वेग घेतील. वॉर्डात तोंडओळख कार्यक्रम सुरूनगराध्यक्षपदाच्या शर्यतीत अनेकांनी फिल्डींग लावलेली आहे. मागीलवेळी आरक्षण निश्चित झाले तर नगराध्यक्षपदाची निवडणूक कुणी लढवायची याची आखणी सुरू केली होती. नगराध्यक्षपद डोळ्यापुढे ठेऊन इच्छुकांनी दोन महिन्यांपासून नगरपरिषद क्षेत्रात तोंड ओळख निर्माण करणे सुरू केले आहे. काही तर शुभेच्छांचे बॅनर लावून ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काहींना वॉर्ड आठवू लागले असल्यामुळे दररोज वॉर्डावॉर्डाचा फेरफटका मारणे सुरू आहे.