शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

संच निर्धारणाला स्थगिती

By admin | Updated: October 29, 2014 22:44 IST

शैक्षणिक सत्र २०१३-१४ शिक्षक कर्मचारी निर्धारणाच्या विरोधात महाराष्ट्र शिक्षक परिषदेच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका टाकण्यात आली होती. सदर याचिकेवर

भंडारा : शैक्षणिक सत्र २०१३-१४ शिक्षक कर्मचारी निर्धारणाच्या विरोधात महाराष्ट्र शिक्षक परिषदेच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका टाकण्यात आली होती. सदर याचिकेवर २९ आॅक्टोबरला न्यायायलयात सुनावणी झाली. त्यावर न्यायाधीश गवई आणि न्यायाधीश देशपांडे यांनी या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे सेवासमाप्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या हजारो शिक्षण सेवकांना दिलासा मिळाला आहे.शिक्षणाचा कायद्यानुसार सत्र २०१४-१५ मध्ये सत्र २०१३-१४ ची दिलेली संचमान्यता यामुळे शिक्षक व कर्मचारी मोठ्या प्रमाणात अतिरिक्त ठरविण्यात आले. याच प्रकरणात मात्र शिक्षणसेवकांच्या सेवा समाप्त करण्याचे फर्मान जारी करण्यात आले होते. यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये भीती निर्माण झाली होती. शिक्षणसेवकांना नोकरी गमवावी लागत असल्यामुळे त्यांची दयनीय झाली होती. यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व अमरावती जिल्हा शाखा भंडारा यांच्या वतीने शिक्षक परिषद व अमरावती जिल्हा शाखा संघ यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. सदर याचिकेवर निर्णय देत शैक्षणिक सत्र २०१३-१४ च्या कर्मचारी संच निर्णयाला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे शिक्षण सेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिक्षणाच्या कायद्याचा धाक दाखवत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरविले जात होते. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने या विरोधात शासनाकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र शासन कोणत्याही प्रकारे निर्बंध लावत नसल्याचे लक्षात येत येताच शिक्षक परिषदेच्यावतीने याचिका दाखल करण्यात आली. शिक्षक परिषदेतर्फे अ‍ॅड. आनंद परचुरे यांनी बाजू मांडली. शिक्षक परिषदेच्या मागणीसाठी आमदार नागो गाणार, डॉ. उल्हास फडके, अंगेश बेहलपांडे, अशोक तेलपांडे, अशोक वैद्य, कांचन गहाणे, डी.एफ. वानी, पी.एम. नाकाडे, राधेश्याम धोटे यांनी पुढाकार घेतला होता. (शहर प्रतिनिधी)