The survey team should make 10 home visits daily | सर्वेक्षण पथकाने दररोज १० गृहभेटी द्याव्या

सर्वेक्षण पथकाने दररोज १० गृहभेटी द्याव्या

ठळक मुद्देएम.जे. प्रदीपचंद्रन : सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, तहसीलदार व बीडीओंनी समन्वय ठेवावा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वाेतोपरी उपाययोजना करीत आहे. ग्रामीण भागातील जलद सर्वेक्षण पथकाने प्राधान्याने दररोज दहा गृहभेटी देवून त्यांचा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांना द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्र यांनी अधिकाऱ्यांना दिले.
कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर कायदा, सुव्यवस्थेसंबंधी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषद व नगरपंचायतीचे मुख्याध्याधिकारी तसेच इतर विभाग प्रमुखांची बैठक जिल्हा परिषद सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भुमेश्वरी एस., जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय अधिकारी डॉ. कृष्णनाथ पांचाळ, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद मोटघरे आदी उपस्थित होते.
कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक गावात जलद सर्वेक्षण पथकाची अंमलबजावणी योग्यरितीने करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व आशा वर्कर यांच्या नावासह आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्वरीत निर्गमित करावी, जलद सर्वेक्षण पथकाने दररोज दहा गृहभेटी देणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. आवश्यक कामासाठी घराबाहेर जाण्यास परवानगी देण्यासाठी भंडारा शहरात चार झोन तयार करावे, आवश्यक असल्यास परवानगी द्यावी, तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना परवानगी देण्यासाठी उपविभागीय अधिकाºयांनी नायब तहसीलदारांची नियुक्ती करावी तसेच शहरी भागात नगरपरिषद व नगरपंचायत, मुख्याधिकारी हे त्यांनी नेमून दिलेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्त करतील, असे आदेश देण्यात आले.

बैठकीतून संदेश
जिल्हा परिषद सभागृहात आयोजित बैठकीत उपस्थित सर्व अधिकारी विशिष्ठ अंतर ठेवून बसलेले होते. सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत प्रत्येक अधिकाऱ्यांनी या बैठकीतून नागरिकांना एकप्रमारे संदेशच दिला. बैठकीला उपस्थित सर्व अधिकारी विशिष्ठ अंतरावर बसले होते.

Web Title: The survey team should make 10 home visits daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.