शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

घरकुल लाभार्थ्यांची लूट थांबविण्यासाठी बीडीओंना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 5:00 AM

आक्रमक पवित्रा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेत त्यांच्या कक्षातच तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन करून घेराव घातला. सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत खंडविकास अधिकारी यांनी  घरकूल लाभार्थ्यांकडून अवैध वसुली करणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेचे अभियंता बारस्कर यांना आपल्या कक्षात बोलावून संबंधित लाभार्थी व आंदोलकांसमक्ष संबंधित अभियंता बारस्कर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन आंदोलकांना देण्यात आले. त्या धर्तीवर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. 

ठळक मुद्देतुमसर येथील प्रकार : प्रकरण अभियंत्यांकडून होणाऱ्या वसुलीचे

लाेकमत न्यूज नेटवर्कतुमसर : प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मंजूर घरकुलाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात वळती करण्यासाठी शाखा अभियंता लाभार्थ्यांकडून पैशाची वसुली करीत आहेत. तुमसर तालुका काँग्रेस कमेटी व छावा संग्राम परिषदेतर्फे संबंधित लाभार्थ्यांसमवेत तुमसर खंडविकास अधिकारी धीरज पाटील यांच्या कक्षात  दोन तास ठिय्या मांडून आंदोलन केले व त्यांना  घेराव घातला. तुमसर समिती अंतर्गत ९७ ग्रामपंचायतींचे कार्यक्षेत्र येत असून, सदर ग्रामपंचायतींच्या हद्दीतील गरजू लाभार्थ्यांना शासनाकडून प्रधानमंत्री आवास घरकूल योजना मंजूर झाली आहे. त्या लाभार्थ्यांच्या खात्यात घरकूल योजनेचा पहिला, दुसरा व तिसरा अशा तीन टप्प्यांत रक्कम जमा केली जाते. परंतु, येथील प्रधानमंत्री आवास योजना विभागातील कंत्राटी  अभियंता प्रणय बारस्कर तालुक्यातील गरजू लाभार्थ्यांकडून खात्यात पैसे जमा करून देण्याच्या नावाखाली अवैध पैशांची वसुली करीत असल्याची व मानसिक, आर्थिक त्रास देत असल्याची तक्रार तुमसर खंडविकास अधिकारी  धीरज पाटील यांना संबंधित घरकूल लाभार्थ्यांनी केली. त्या प्रकरणाची दखल घेत तुमसर तालुका काँग्रेस कमेटी व छावा संग्राम परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटी अभियंता बारस्कर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत नाही तोपर्यंत येथील खंडविकास अधिकारी धीरज पाटील यांना त्यांच्या कक्षाबाहेर जाऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेत त्यांच्या कक्षातच तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन करून घेराव घातला. सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत खंडविकास अधिकारी यांनी  घरकूल लाभार्थ्यांकडून अवैध वसुली करणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेचे अभियंता बारस्कर यांना आपल्या कक्षात बोलावून संबंधित लाभार्थी व आंदोलकांसमक्ष संबंधित अभियंता बारस्कर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन आंदोलकांना देण्यात आले. त्या धर्तीवर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. दरम्यान, आंदोलकांनी संबंधित घरकूल आवास योजनेचे अभियंता  बारस्कर यांच्यावर आठ दिवसांत कारवाई करण्यात आली नाही, तर यापुढे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा  दिला. या वेळी तुमसर तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष शंकर राऊत, रमेश पारधी, कलाम शेख, हिरालाल नागपुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बालकदास ठवकर, सरपंच आनंद सिंगनजुडे,  गळिराम बांडेबुचे, रामदास बडवाईक, देवा भगत, शुभम गभने, प्रफुल वराडे, भोला राखडे आदी उपस्थित होते. याप्रकरणाची दखल घेण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना