शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी धानाची मळणी जोमात, मात्र खरेदी केंद्रच कोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2022 05:00 IST

गत खरीप हंगामात शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. धानाचे मोजमाप वेळेत झाले नव्हते. शेतकऱ्यांना धानाचे चुकारेसुद्धा वेळेवर मिळाले नव्हते. अत्यल्प उत्पादन हाती आल्याने खर्चही भागेना, अशी अवस्था झाली. त्यातच केंद्र संचालकांनी शासनाच्या धोरणांचा पाढा वाचत धान खरेदीकरीता डिजिटल सातबाराची अट घातल्याने धानाच्या मोजमापास उशीर झाला होता. 

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : उन्हाळी धानाची कापणी व मळणी सध्या जोमात सुरू आहे. परंतु अद्यापही खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाने गोदाम भरलेले आहेत. जिल्ह्यात रब्बी धान खरेदीसाठी शासकीय आधारभूत केंद्रे सुरू झालेली नाहीत. धान खरेदीला मर्यादा शासनाने घातल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहेत. त्यामुळे खरेदीच प्रभावित होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. सध्या लग्न हंगाम सुरू आहे. घरच्या मुला-मुलीचे लग्न व अन्य समारंभांसाठी पैसा आणायचा कुठून, असा प्रश्न आहे.गत खरीप हंगामात शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. धानाचे मोजमाप वेळेत झाले नव्हते. शेतकऱ्यांना धानाचे चुकारेसुद्धा वेळेवर मिळाले नव्हते. अत्यल्प उत्पादन हाती आल्याने खर्चही भागेना, अशी अवस्था झाली. त्यातच केंद्र संचालकांनी शासनाच्या धोरणांचा पाढा वाचत धान खरेदीकरीता डिजिटल सातबाराची अट घातल्याने धानाच्या मोजमापास उशीर झाला होता. अखेर डिजिटल सातबारा रद्द करून तलाठ्यांच्या सातबारावर धान खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात अनेक आंदोलने केली. प्रशासनाने दखल घेत जुन्याच सातबारावर धान खरेदी करण्याचे आदेश दिले हाेते. आता खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाने अद्यापही गोदाम भरलेले आहेत. उन्हाळी धानाची कापणी व मळणी जोमात सुरू आहे. त्यातच शासनाने धान खरेदीची मर्यादा जाहीर केल्याने उर्वरित धानाची विक्री करायची कुठे, असा प्रश्न  निर्माण होणार आहे. त्यामुळे उन्हाळी धानाची खरेदी होणार किंवा नाही, अशा शंकाही उपस्थित होत आहेत. धान खरेदी केंद्र सुरू करून काटे होतील, शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, याची प्रशासनाने दखल घेण्याची तसेच पुरेशा गोदामांची व्यवस्था करून देण्याची गरज आहे.

करडी परिसरातील मुंढरी, पालोरा, देव्हाडा, करडी, डोंगरदेव येथे धान खरेदी केंद्रे आहेत. परंतु अद्यापही उन्हाळी धानाची खरेदी सुरू झालेली नाही. त्यातच अनेक ठिकाणी गोडामे रिकामी नसल्याने खरेदी रखडणार आहे. प्रशासनाने वेळीच दखल घेऊन सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल. -महेंद्र शेंडे, सरपंच करडी.

 

टॅग्स :agricultureशेतीMarketबाजार