शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने झोडपले

By admin | Updated: December 22, 2015 00:36 IST

सोमवारला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली. अर्धा तासानंतर पुन्हा पाऊस बरसल्यामुळे ...

शेतकऱ्यांवर अस्मानी संकट : कोरडवाहूसाठी फायदेशीर, ओलिताचे होणार नुकसानभंडारा : सोमवारला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली. अर्धा तासानंतर पुन्हा पाऊस बरसल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. हा पाऊस कोरडवाहू शेतीसाठी लाभदायी असला तरी ओलिताखाली असलेल्या शेतीला नुकसानदायी ठरला आहे.दिवसभर उन्ह-सावल्यांचा खेळ सुरु होता. अचानक सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पावसापासून बचावासाठी अनेकांना मिळेल त्या ठिकाणी आडोसा घ्यावा लागला. त्यानंतर ७ वाजताच्या सुमारास काहीवेळ वीज पुरवठा खंडीत झाल्याने सर्वत्र काळोख पसरला होता. खरीप हंगाम असमाधानकारक असतानाच पावसाने हजेरी लावल्यामुळे भंडारा परिसरात अकाली पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. लाखनी, भंडारा, मोहाडी परिसरात पावसाने हजेरी लावली. पवनी तालुक्यातील अड्याळ व लाखांदूर तालुक्यातील मासळ परिसरात ढगाळ वातावरण होते. परंतु पाऊस बरसला नाही. कडधान्यांसह पऱ्हे टाकलेल्या रबी धानपिकांसाठी हा पाऊस नुकसानदायक ठरला. कडधान्यांवर किडीच्या प्रादुर्भाव वाढला आहे. चौरास भागात हरभरा, मूग, तूर, लाखोळी, गहू, पोपट, जवस आदी कडधान्ये लावली आहेत. सोबतच रबी धानाच्या पऱ्हे पेरणीच्या कामाला सुरुवात केली आहे. पावसासह ढगाळ वातावरण असल्याने हरभरा, मूग, तूर, लाखोळी, गहू, पोपट, जवस आदी कडधान्यांवर कीडींनी आक्रमण केले आहे. तुरींवर अळी वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी धान खरेदी केंद्रांच्या आवारात धानाची पोती उघड्यावर असल्यामुळे या धानाला पावसाचा फटका बसला आहे. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरुच होती. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना निसर्गाच्या अवकृपेचा सामना मात्र करावा लागत आहे. (नगर प्रतिनिधी)