विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा अतिउत्साह टाळावा
By Admin | Updated: January 6, 2016 00:51 IST2016-01-06T00:51:08+5:302016-01-06T00:51:08+5:30
विज्ञान व तंत्रज्ञानाने वेगवान प्रगती तथा घडामोडी मानवी जीवनात घडत आहे. याचे फायदे आहेत,

विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा अतिउत्साह टाळावा
हेमंत केळवदे यांचे प्रतिपादन : स्रेहसंमेलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रम
तुमसर : विज्ञान व तंत्रज्ञानाने वेगवान प्रगती तथा घडामोडी मानवी जीवनात घडत आहे. याचे फायदे आहेत, परंतु या तंत्रज्ञानाच्या आहारी गेल्यास त्याचा दुष्परिणाम होतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा अतिउत्साह टाळावा, असे प्रतिपादन जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत केळवदे यांनी केले.
जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील स्रेहसंमेलनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अतिथी म्हणून सेवानिवृत्त पशुवैद्यकीय आरोग्य उपसह संचालक डॉ. कृपाचार्य बोरकर, पर्यवेक्षक रंजनकुमार डे, सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक जी.जे. चव्हाण, सेवानिवृत्त प्रा. व्ही.एम. कुलरकर, भास्कर बडवाईक, शिक्षक अजय बोरकर उपस्थित होते.
तीन दिवसीय स्रेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी देशभक्तीगीत, भावगीत आदिवासीनृत्य, कोळीनृत्य, एकलनृत्य, नाटक, वर्ग सजावट, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, समुहनृत्य, उखाने स्पर्धा सादर केल्या. यात आदिवासी नृत्य रेला रे रेला ने सर्वांना मंत्रमुग्ध केले.
समाजप्रबोधनपर नाटक, हुंडाबंळी, स्वच्छ भारत अभियान, प्रदूषण, दारूचे दुष्परिणाम ही नाटके विद्यार्थ्यांनी सादर केली.
तबला वादन प्रा. संजय नेमाडे, संगीत दिग्दर्शन, प्रा. मंगला ओलेकर, नितीन रंगारी यांनी केले. अतिथी परिचय प्रा. वसंत सार्वे, संचालन प्रा. विद्यानंद भगत, अहवाल वाचन प्रा. एन.टी. कापगते यांनी तर आभार प्रा. मोहन भोयर यांनी मानले.
स्रेहसंमेलनाासाठी प्रा. गणेश चाचीरे, प्रा. नितीन पाटील, प्रा. आशिष खोब्रागडे, प्रा. शशिकला पटले, धमेंद्र कोचे, विद्यार्थी अर्जुन शहारे, प्रगती कुरसुंगे, आकाश कांबळे, विक्की गुर्वे, दिगांबर उपरीकर, हितेश गायधने, चिंटू आस्वले, कृष्णा बांते, राहुल खोब्रागडे, शुभम डोरले, भूषण गाढवे, तुषार चकोले, अजय यादव, अमोल पंचबुद्धे, पराग चोपकर, प्रतिक्षत्त काळे, अपेक्षा उखरे, मनीषा ठाकूर, अंकीत तुमसरे, त्रिशूल आंबेकर, शिशिर कौशल, नीलिमा कहालकर, काजन कामथे, पल्लवी पटले यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)