आॅनलाईन लोकमतभंडारा : शालेय विद्यार्थ्यांना वर्तमानपत्रातील तांत्रिक व संपादकीय माहिती जाणून घेण्याच्या उद्देशाने भंडारा येथील अंकुर विद्या मंदिर शाळेच्या व्यवस्थापनाने १३५ विद्यार्थ्यांची लोकमतच्या बुटीबोरी येथील प्रकाशन स्थळाला भेट दिली. यावेळी या शालेय विद्यार्थ्यांनी वृत्तपत्र छपाईचे बारकावे जाणून घेतले.२९ डिसेंबर रोजी अंकुर विद्या मंदिर शाळेच्या २४ शिक्षकांसह १३५ विद्यार्थ्यांच्या चमूने लोकमत बुटीबोरी ुप्रिंटींग प्रेसला सदिच्छा भेट दिली. यात वृत्तपत्र छपाईच्या उच्च प्रतिच्या कामाची पद्धत (एसओपी) याबाबत येथील लोकमतच्या तेथील स्टाफने माहिती दिली.यात वर्तमानपत्र छपाईची पॉवर प्रेझेंटेशनद्वारे (पीपीटी) संपादकीय कामे, जाहिरात, पानांची बांधणी आदी विभागाची माहिती देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी बातमी येण्यापूर्वी व बातमी तयार करण्याचे बारकावे समजावून घेतले. विशेष म्हणजे हे विद्यार्थी यावेळी प्रकाशित करण्यात येत असलेल्या सखी पुरवणीचे प्रत्यक्ष साक्षीदार ठरले.यावेळी या विद्यार्थ्यांना लोकमतच्या ‘ग्रीन एनर्जी प्लाँट’लाही भेट दिली. यात पाणी, कोळसा व अन्य कुठल्याही संसाधनांच्या उपयोगाविना सौर ऊर्जेवर (सोलर प्लॉन्ट) मशिन्स कशा कार्यान्वित होतात याचीही माहिती समजावून सांगण्यात आली.
विद्यार्थ्यांनी जाणून घेतले वृत्तपत्र छपाईचे बारकावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 22:45 IST
शालेय विद्यार्थ्यांना वर्तमानपत्रातील तांत्रिक व संपादकीय माहिती जाणून घेण्याच्या उद्देशाने भंडारा येथील अंकुर विद्या मंदिर शाळेच्या व्यवस्थापनाने १३५ विद्यार्थ्यांची लोकमतच्या बुटीबोरी येथील प्रकाशन स्थळाला भेट दिली.
विद्यार्थ्यांनी जाणून घेतले वृत्तपत्र छपाईचे बारकावे
ठळक मुद्देलोकमत चमूशी साधला संवाद : अंकुर विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांची लोकमतच्या बुटीबोरी प्रिटींग प्रेसला भेट