शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

समुपदेशन चाचणीला विद्यार्थ्यांची दांडी

By admin | Updated: June 15, 2016 00:43 IST

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार माध्यमिक स्तरावर व्यवसाय, मार्गदर्शन व समुपदेशन अंतर्गत शालेय शिक्षण....

कलचाचणीचा उपयोग काय? : लक्ष्यांक उद्दिष्टाची जबाबदारी कुणावर?भंडारा : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार माध्यमिक स्तरावर व्यवसाय, मार्गदर्शन व समुपदेशन अंतर्गत शालेय शिक्षण विभागातर्फे फेब्रुवारी महिन्यात विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यात आली होती. निकालानंतर ६ ते १६ जून यादरम्यान या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक समुपदेशन होत असून यात आतापर्यंत फक्त चार विद्यार्थ्यांचेच समुपदेशन झाले आहे.हजारोंच्या संख्येने परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी फक्त चार विद्यार्थ्यांचे समुपदेशन झाल्याने फेब्रुवारी महिन्यात झालेल्या कलचाचणीचा कल निकालानंतर समुपदेशनाअभावी अपूर्ण राहिला आहे. याची सर्वस्वी जबाबदारी कुणाची, पालकांची की शिक्षण विभागाची, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. ज्याप्रमाणे शासन निर्णय अंतर्गत कलचाचणी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आवश्यक करण्यात आली होती. त्याच धर्तीवर समुपदेशन चाचणी अनिवार्य नसल्याने या चाचणीकडे विद्यार्थ्यांनी पाठ केली आहे. यावर्षीच्या १० वीच्या निकालात नागपूर विभागातून भंडारा जिल्हा चवथ्या स्थानावर आहे. जिल्ह्यात दहावीच्या २८६ शाळा आहेत. यावर्षी जिल्ह्यातून २०,३७४ विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी नोंदणी केली होती. यात १०,२२६ मुले तर १००९५ मुलींनी परिक्षा दिली. यापैकी ८,३१६ मुले व ८,७५८ मुली उर्तीर्ण झाल्या. मात्र जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या समुपदेशनांतर्गत विद्यार्थ्यांनी याकडे कानाडोळा केला आहे.या समुपदेशनात विद्यार्थ्यांचा कल विचारात घेऊन त्यांना त्यांच्या आवडीनुसार व क्षमतेनुसार वेळीच शैक्षणिक क्षेत्र निवडीसाठी मदत केल्यास त्यांच्या उपजत कलागुणांना पुरेसा वाव मिळतो. राज्याच्या शैक्षणिक आकृतिबंध विचारात घेता प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक क्षेत्रांची व व्यवसायांची माहिती या समुपदेशनातून दिली जात असते. विद्यार्थ्यांना स्वत:चा कुटुंबाबरोबरच भारतीय समाज रचनेचा एक जबाबदार व सुसंस्कृत नागरिक घडविण्याची जबाबदारी पालक आणि शाळेची आहे. त्याकरीता विद्यार्थ्यांना अनुरूप मार्गदर्शन व सहाय्य देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांचे मानसशास्त्रीय कसोट्यांच्या आधारे विविध शैक्षणिक क्षेत्रासंबंधात मार्गदर्शन व समुपदेशन करण्याची शासनाची रूपरेषा होती. परंतु कलचाचणी नंतर समुपदेशनाचा कार्यक्रम सपशेल फेल ठरला आहे.समुपदेशनासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण महाविद्यालय (डी.एड.) येथे तीन समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाकडे वाढणारा कल लक्षात घेता त्यांना यासंदर्भात शास्त्रीयदृष्ट्या योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे असताना समुपदेशनाचे कार्य अधांतरी राहिले आहे. विशेष म्हणजे १० वीचा निकाल लागून नऊ दिवसांचा कालावधी लोटूनही समुपदेशनासाठी विद्यार्थी गोळा होवू शकले नाही. याबाबत शिक्षण विभागावर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांचा कल चाचणीचा निकाल व प्रवेश प्रक्रिया यांचा कोणताही संबंध नसला तरी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाअंतर्गत समुपदेशन हा उपक्रम यशस्वी होवू शकलेला नाही. (प्रतिनिधी)