शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
2
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
5
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
6
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
7
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
8
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
9
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
10
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
11
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
12
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
13
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
14
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
15
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
16
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
17
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
18
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
19
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
20
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भंडाऱ्यात संतप्त ट्रक मालकांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2016 00:30 IST

रेतीची वाहतूक करीत असताना दिलीप रोहणकर (४६) या ट्रकचालकाचा ट्रकखाली दबून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारला रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.

प्रकरण ट्रकचालकाच्या मृत्यूचे : लाखांदूर पोलीस ठाण्यासमोर ट्रकचालक-मालक संघटनेची निदर्शनेभंडारा : रेतीची वाहतूक करीत असताना दिलीप रोहणकर (४६) या ट्रकचालकाचा ट्रकखाली दबून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारला रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. त्यानंतर संतप्त ट्रकचालक-मालकांनी दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, या मागणीला घेऊन भंडारा येथे बुधवारला दुपारी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. दरम्यान, संतप्त आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. याप्रकरणी ३१ आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लाखांदूर : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांच्याकडे लाखांदूर व विरली (बुज) क्षेत्रातील रेती घाटांच्या चौकशीचे अधिकार देण्यात आले. ६ सप्टेंबरला रात्री ८ वाजताच्या दरम्यान मोहरना, नांदेड, ईटान, गवराळा या क्षेत्रामधील अन्य रेतीघाटावरून ट्रक व ट्रॅक्टरद्वारे रेतीची अवैधरीत्या वाहतूक होऊ नये, यासाठी तपासणी करीत असताना ईटान मार्गावर विरली (बुज) चौकीजवळ एम.एच. ३३/४४८५, एम.एच. ३३/४४९८, एम.एच. ३१/ सी.क्यु. ११२१ हे तीन रेती भरलेले ट्रक थांबवून चौकशी केली असता ट्रक ओव्हरलोड आढळून आले. त्यापैकी एम.एच. ३३/४४९८ या ट्रक चालकांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आकारलेला दंड भरून पुढचा मार्ग धरला. परंतु एम.एच. ३१/ सी.क्यु. ११२१ या ट्रकचालकाने तीन ब्रास रेतीचा परवाना दाखवून प्रत्यक्षात ट्रकमध्ये ४.५ ब्रास रेती असल्याचे अधिकाऱ्यांना दिसून आले. दंडाची रक्कम भरण्यासाठी ट्रकचालकाने विरोध दर्शविल्याचे नायब तहसीलदार मोहोड यांचे म्हणने आहे. महसूल अधिकाऱ्यांसोबत वाद घालून अन्य रेती व्यावसायिकांना फोन केला. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस मदत मागविण्यात आली. रात्री ९.३० च्या दरम्यान पोलीस वाहनासह घटनास्थळी आले असता ट्रकचालक रोहणकर यांनी ट्रक सुरू करून पवनीमार्गे निघाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. धामणी शिवारात ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून रोहणकर यांचा जागीच मृत्यू झाला. परंतु रोहणकर यांना महसूल विभागाचे अधिकारी व पोलिसांनी ट्रकमधून ओढल्याचा ट्रकचालक मालक संघटनेने आरोप केला आहे.याप्रकरणी हगययीने ट्रक चालवून स्वत:चे अपघातास कारणीभूत होऊन मरण पावला, अशी लेखी तक्रार नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी लाखांदूर पोलीस ठाण्यात दाखल केली. या घटनेची माहिती मिळताच सर्व रेती ट्रक चालक-मालकांनी रात्रीच लाखांदूर पोलीस ठाण्याकडे धाव घेऊन दोषी अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करीत लाखांदूर पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी भंडारा, पवनी, अड्याळ, दिघोरी, पालांदूर येथून पोलिसांची कुमक बोलाविली. (तालुका प्रतिनिधी)अपघात की घातपात?घटनास्थळाच्या निरीक्षणांती याघटनेविषयी गावकऱ्यांमध्ये तर्कवितर्कांना ऊत आला असून हा खरोखरच अपघात की घटनास्थळावर नायब तहसीलदारांच्या ताफ्यातील कर्मचाऱ्यांसोबत ट्रकचालक रोहणकर यांची बाचाबाची होऊन कर्मचाऱ्यांनी काही घातपात केला का? असाही संशय व्यक्त होत आहे. मृत्यूला जबाबदार कोण?सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत रेतीघाट सुरु असताना रात्रीअपरात्री रेतीची वाहतूक होते कशी? असा प्रश्न विरली येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. रेती व्यवसायातून मोठी कमाई सुरू आहे. परंतु महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी यात मागे नाहीत. एक पोलीस अधिकारी रेती प्रकरणात एसीबीच्या जाळ्यात अडकलेला लोकांनी पाहिलेला आहे. एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने रेती घाटाशी मैत्री जोडून स्वत:ची गुंतवणूक रेतीघाटात केल्याची चर्चा आहे. ३१ जणांना घेतले ताब्यातट्रक चालक दिलीप रोहणकर यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी संतप्त ट्रक चालक मालक संघटनेने रास्ता रोको केला. याप्रकरणी ट्रक मालक चालक संघटनेचे नरेंद्र बुरडे, महेंद्र निंबार्ते, श्रीराम पोहरकर, नितीन तिवारी, गजानन ठवरे, संजय गायधने, खेमराज हटवार, आशिष कळंबे, समोहन मेश्राम, अब्दुल शेख, राहुल मरठे, राकेश पाल, विनोद तुळणकर, शिवा गायधने, जारेश्वर टांगले, नंदकिशोर सवारबांधे, फिरोज अंसारी, कयाम खान, महम्मद इनाबुल खान, आशिष सातपुते, शत्रुघ्न कानतोडे, दिपक मानापुरे, सुरेंद्र पोटे, प्रशांत पानसे, शेखर मोहनकर, अशोक नांदुरकर, उमेश हटवार यासह अन्य पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हे नोंदविले आहेत.जमावाने जाळला तपासणी नाका पवनी : पवनी व लाखांदूर तालुक्यातील रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक सुरु असल्याने तपासणी करण्यासाठी पवनी बस स्थानकाजवळ पोलीस व महसूल विभागाने उभारलेली (राहुटी) तपासणी चौकी ५० ते ६० जणांच्या जमावाने बुधवारला पहाटे जाळली. पोलीस सूत्रानुसार, इटान घाटावरून वाहतूक करणाऱ्या रेतीच्या ट्रकचा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठलाग केला. त्यावेळी विरली गावानजिक चालकाने ट्रकमधून उडी घेऊन पसार होण्याच्या हेतूने खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. परंतु ते ट्रकखाली चिरडल्यामुळे दिलीप रोहणकर या वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती रेतीघाटाशी संबंधितापर्यंत क्षणात पोहचली. पाहता पाहता नागपूरपासून लोक पोहचले. मृतदेह पवनी व नंतर भंडारा येथे पाठविण्यात आला. ही सर्व मंडळी प्रशासनावर दबाव आणण्यासाठी पवनी बस स्थानकाजवळ उभारलेल्या तंबूच्या चौकीजवळ पोहचले व त्यांनी चौकी जाळून टाकली. त्यानंतर कर्तव्यावर असलेल्या महसूल कर्मचाऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पवनी पोलिसांनी समुहाने येऊन धमक्या देणे, शासकीय कामात अडथळा, जाळपोळ करणे व जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आदी गुन्हे दाखल केले. (तालुका प्रतिनिधी)