शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

सोंड्याटोला प्रकल्पस्थळी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

By admin | Updated: July 17, 2016 00:18 IST

बावनथडी नदीवरील महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा थकीत विजेचे देयक असल्याने विज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

राकाँने रोखला मार्ग : आठ दिवसांत वीज जोडणीचे आश्वासनचुल्हाड (सिहोरा) : बावनथडी नदीवरील महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा थकीत विजेचे देयक असल्याने विज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. वीज पुरवठा सुरू करण्यासाठी सिहोरा येथे तुमसर-बपेरा राज्य मार्गावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. तर आठवडाभरात वीज पुरवठा सुरू करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.मागील वर्षभरापासून सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. पावसाळा सुरू असताना नदी पात्रातून पाण्याचा उपसा बंद आहे. यामुळे चांदपूर जलाशयात केवळ ८ टक्के पाणी असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. रास्ता रोको आंदोलन सुरू असताना वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता नंदलाल गडपायले, विदर्भ पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता कुकडे, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता बॅनर्जी व नायब तहसिलदार शिंदे आले. सोंड्याटोला प्रकल्पाकडे ३५ लाख ५५ हजार ५३० रूपये वीज थकबाकी असून पाणीपट्टी कराची वसुली जमा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. सध्या धान पिकाची रोवणी सुरू असताना अशा परिस्थितीत शेतकरी पाणीपट्टी कराची वसुली देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. आठवडा भरात प्रकल्पाचा वीज पुरवठा सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, उपसरपंच उमेश कटरे, ग्राहक संरक्षक समितीचे तालुकाध्यक्ष उमेश तुरकर, बिंदू मोरे, जितेंद्र तुरकर, महेश राहांगडाले, किशोर राहांगडाले, रामलाल पारधी, राजेंद्र बघेले, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश रहांगडाले, गणेश ठाकूर, सुनिल पटले उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र शेटे यांच्या नेतृत्वात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (वार्ताहर)