शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारी भत्त्यासाठी मजुराचे ग्रामपंचायतीला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:01 IST

कोरोना विषाणूचा संसर्ग आणि लॉकडाऊन यामुळे मजुरांची वाताहत झाली. त्यांची आर्थिक स्थिती डबघाईसह आली आहे. यामुळे लॉकडाऊनमध्ये शासनाने यात शिथिलता दिलीे. बहुतांश गावात ग्रामपंचायतीनी नियोजन तयार केल्याने महिनाभर मजुरांना कामे उपलब्ध केले. यामुळे गावात मजुराचे घरात आठ ते दहा लाख व त्यापेक्षा अधिक राशी पोहचली आहे. परंतु काही गावे यात अपवाद ठरली आहेत. सिहोरा गावात नमुना चार अंतर्गत मजुरांनी कामाची मागणी ग्रामपंचायतीला केली आहे.

ठळक मुद्देसिहोरा येथील प्रकार : चुल्हाड क्षेत्राची पुनरावृत्ती होणार काय

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : मग्रारोहयो अंतर्गत कामाचे मागणीनुसार कामे उपलब्ध करण्यात आले नाही. यामुळे सिहोरा येथील मजुरांनी बेरोजगारी भत्ता प्राप्त करण्यासाठी ग्रामपंचायतला निवेदन दिले आहे. यामुळे प्रशासनावर दबाव निर्माण होणार आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग आणि लॉकडाऊन यामुळे मजुरांची वाताहत झाली. त्यांची आर्थिक स्थिती डबघाईसह आली आहे. यामुळे लॉकडाऊनमध्ये शासनाने यात शिथिलता दिलीे. बहुतांश गावात ग्रामपंचायतीनी नियोजन तयार केल्याने महिनाभर मजुरांना कामे उपलब्ध केले. यामुळे गावात मजुराचे घरात आठ ते दहा लाख व त्यापेक्षा अधिक राशी पोहचली आहे. परंतु काही गावे यात अपवाद ठरली आहेत. सिहोरा गावात नमुना चार अंतर्गत मजुरांनी कामाची मागणी ग्रामपंचायतीला केली आहे. यात जाब कार्डधारक ७२० आणि बिगर जाब कार्डधारक १६३ मजुरांची नोंद करण्यात आली आहे. ८८७ मजुरांनी अकुशल कामाची मागणी केल्यानंतर पांदण रस्त्याचे कामांना सुरूवात करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला होता. ७ जूनला पांदन रस्त्याचे कामावर ८८७ मजूर पोहचले असता शेतकऱ्यांनी कामे अडविल्यानंतर मजूर माघारी परतले. मजुराकडे नमुना पाच उपलब्ध आहेत. परंतु नंतर गावाचे शिवारात नव्याने कामे सुरूवात करण्यात आली नाही.अन्य गावात सुरू असणाऱ्या कामावर मजुरांना सामावून घेण्याचे प्रयत्न आले नाही. नमुना चार नंतर मजुरांना १५ दिवसात कामे उपलब्ध करणे गरजेचे असून नंतर मंजुर बेरोजगारी भत्ता प्राप्त करण्याकरिता पात्र ठरत आहेत. याच परिसरात असणाºया चुल्हाड जिल्हा परिषद क्षेत्रातील गोदेखारी, गोंडीटोला, सुकळी नकुल, बिनाखी गावातील रोहयो मजुरांना बेरोजगारी भत्ता प्राप्त करण्याकरिता रोहयो निकषयांचा आधार घेत तत्कालीन सदस्य रमेश पारधी यांनी मोठे आंदोलन केले होते. दीड हजार मजुरांना बेरोजगारी भत्ता वाटप करण्यात आले होते.देशात मजुरांना बेरोजगारी भत्ता वाटप चुल्हाड क्षेत्र एकमेव ठरला होता. यानंतर तत्कालीन तहसीलदार, तत्कालीन बिडीओ आणि तीन ग्रामसेवकावर मजुरांना कामे उपलब्ध करण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.बेरोजगारी भत्ता शासनाने दिल्यास मजुरांना वाटप करण्यात हरकत नाही. उलट मजुरांचा फायदा होईल. ग्रामपंचायतला मजुरांनी निवेदन दिल्याची आजच माहिती मिळाली आहे.-मधु अडमाचे, सरपंच, सिहोरा.सिहोरा गावातील मजुरांना नमुना चार दिले असताना रोहयोची कामे उपलब्ध करण्यात आले नाही. मजूर बेरोजगारी भत्त्याचे पात्र आहेत.-सुनिता मोहनकर, जिल्हाध्यक्ष, भारती मच्छिमार समाज संघटना, सिहोरा.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत