भरधाव कार पुलावरून ५० फूट खोल नदीपात्रात कोसळली! उमरेडच्या हाॅटेल मालकाचा मृत्यू

By जितेंद्र ढवळे | Updated: August 24, 2025 15:02 IST2025-08-24T14:59:27+5:302025-08-24T15:02:58+5:30

रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मरुनदीवर हा भीषण अपघात झाला.

Speeding car fell off a bridge into a 50 foot deep riverbed Umred hotel owner died | भरधाव कार पुलावरून ५० फूट खोल नदीपात्रात कोसळली! उमरेडच्या हाॅटेल मालकाचा मृत्यू

भरधाव कार पुलावरून ५० फूट खोल नदीपात्रात कोसळली! उमरेडच्या हाॅटेल मालकाचा मृत्यू

भिवापूर : श्रावणमासाची सांगता झाल्यामुळे हाॅटेलची दारे उघडण्यापूर्वी मासे आणण्यासाठी पवनी जि. भंडारा येथे गेलेल्या उमरेड येथील हाॅटेल मालकाचा भरधाव कार पुलावरून ५० फुट नदी पाञात कोसळल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. हा अपघात रविवार सकाळी ८ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय मार्गावरील मरूनदी पुलावर झाला.

सागर मधूकर वाघमारे (३०) रा. उमरेड असे मृत हाॅटेल मालकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार मृतक सागरचे उमरेड येथे राष्ट्रीयमार्गावर हाॅटेल आहे. श्रावणमासाची सांगता झाल्यामुळे रविवारला हाॅटलेची दारे उघडण्यापूर्वी सागर हा मासे आणण्यासाठी उमरेड येथून पहाटे ५ वाजताच्या सुमारास आपल्या टाटा हॅरिअर कार क्र. एम.एच. ४० सी.एक्स. ७९२६ ने पवनी येथे गेला होता. परतीच्या प्रवासात भरधाव कारवरील नियंञण सुटल्याने राष्ट्रीयमार्गावरील वळणावरून ही कार अंदाजे  पुलावरून ५० फुट खोल नदीपाञात शिरली. नदीपाञात पाणी असल्यामुळे सागरचा घटनास्थळीच मृत्यू झाला. 

याबाबत माहिती मिळताच, ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने पाण्यात बुडालेल्या कारमधून सर्वप्रथम मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर जेसीबी व क्रेनच्या मदतीने कार सुध्दा बाहेर काढण्यात आली. मृतदेह शवविच्छेदणाकरीता रूग्णालयात रवाना करण्यात आला आहे. 

पुलावरील सुरक्षा कठडे तुटले

ही  हॅरियर कार राष्ट्रीयमार्गावरील वळणावर सुरक्षेसाठी ठेवलेले लोखंडी ड्रम व पुलावरील सुरक्षा कठडे तोडून अंदाजे ५० मिटर लांब व ५० फुट खोल नदीपाञात शिरली. यावरून कारचा वेग किती असावा, याचा अंदाज येतो. नदीपाञातील पाण्यात बुडालेल्या कारमधून मृतदेह बाहेर काढल्यानंतर सागरच्या डोक्याला एक किरकोळ जखम आढळली. त्यामुळे सागरचा मृत्यू हा पाण्यात बुडाल्यामुळे झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

Web Title: Speeding car fell off a bridge into a 50 foot deep riverbed Umred hotel owner died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात