शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

जिल्ह्यात दोन दिवस कोरोना लसीकरणाची विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 5:00 AM

जिल्ह्यात लसीकरण मोहीम वेगात सुरु आहे. मात्र ग्रामीण भागात नागरिकांमध्ये लसीवरुन प्रचंड गैरसमज आहे. त्यामुळेच लस घेण्यासाठी अनेकजण घाबरत आहेत. जिल्ह्याच्या विविध भागात लसीकरण कमी होत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात लसीकरण केंद्रावर गर्दी असल्याने शहरातील नागरिक तेथे जाऊन लसीकरण करीत असल्याचे चित्र गत काही दिवसांपूर्वी दिसून येत होते. त्यानंतरही ग्रामीण जनता लसीकरणासाठी पुढाकार घेत नव्हते. विविध माध्यमातून त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

ठळक मुद्देसंदीप कदम : २१ व २२ जून रोजी मोहिमेचे निर्देश

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना लसीकरणात कमी प्रतिसाद असलेल्या किंवा अत्यल्प प्रतिसाद असलेल्या गावांतील ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी २१ व २२ जून रोजी विशेष लसीकरण मोहीम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले. यासाठी शुक्रवारी ते रविवारदरम्यान विशेष जनजागृती अभियान घेण्याची सूचनाही त्यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयातून दृरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून कोरोना लसीकरणाचा बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी निर्देश दिले. यावेळी उपजिल्हाधिकारी महेश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. प्रशांत उईके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास, डाॅ.माधुरी माथूरकर उपस्थित होते. सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. कोरोनावर लस हाच एकमेव इलाज असून, नागरिकांनी लस घ्यावी यासाठी तालुकास्तरीय अधिकारी, शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी गावात घरोघरी भेट देऊन लोकांना प्रोत्साहित करावे, असे जिल्हाधिकारी कदम यांनी सांगितले. यासाठी गावचे सरपंच व स्थानिक लोकप्रतिनिधींचे सहकारी घेण्याचेही त्यांनी आवाहन केले.पुढील पाच ते सहा दिवस लसीकरणावर लक्ष केंद्रित करून कमी टक्केवारी असलेल्या गावांत लसीकरण वाढविण्यावर भर देण्यात यावा, सर्व यंत्रणांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे, अशी सूचना यावेळी देण्यात आली. जिल्ह्यात लसीकरण मोहीम वेगात सुरु आहे. मात्र ग्रामीण भागात नागरिकांमध्ये लसीवरुन प्रचंड गैरसमज आहे. त्यामुळेच लस घेण्यासाठी अनेकजण घाबरत आहेत. जिल्ह्याच्या विविध भागात लसीकरण कमी होत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात लसीकरण केंद्रावर गर्दी असल्याने शहरातील नागरिक तेथे जाऊन लसीकरण करीत असल्याचे चित्र गत काही दिवसांपूर्वी दिसून येत होते. त्यानंतरही ग्रामीण जनता लसीकरणासाठी पुढाकार घेत नव्हते. विविध माध्यमातून त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यात येत आहे. आता त्याचाच एक भाग म्हणून ४५ वर्षावरील नागरिकांसाठी दोन दिवस विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

जिल्ह्यात २४४ गावांत अल्प प्रतिसाद- भंडारा जिल्ह्यात ग्रामीण भागात लसीबाबत अनेक गैरसमज असून हे गैरसमज दूर करून लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. सोमवारी १३० गावांत तर मंगळवारी ११४ गावांमध्ये ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. लसीकरण कमी असलेल्या गावांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. भंडारा ५३, मोहाडी २६, साकोली ४८, लाखनी २५, पवनी ३९, लाखांदूर ३४, तुमसर १९ अशा २४४ गावांमध्ये ही मोहीम राबविली जाणार आहे. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या