शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

समस्या सोडविण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना घेराव

By admin | Updated: March 1, 2016 00:25 IST

शहरातील विविध प्रभागातील समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी नगरसेवक महेंद्र निंबार्ते यांच्या नेतृत्वात सोमवारला....

भंडारा : शहरातील विविध प्रभागातील समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी नगरसेवक महेंद्र निंबार्ते यांच्या नेतृत्वात सोमवारला दुपारी मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. शहरातील नागरिकांना अतिक्रमण, दूषित पाणी पुरवठा, कचरा निर्मुलण व अस्वच्छता या नानाविध समस्यांना तोंड दयावे लागत आहे. याबाबत पालिका मुख्याधिकारी व नगराध्यक्षांकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या. पंरतु पालिका प्रशासनाने यावर प्रभावी उपाययोजना केली नाही. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालून समस्या अवगत करण्यात आल्या. प्रभाग क्रमांक ५ मधील मैदामील मागील वसाहतीत रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्याची डागडुजी करण्यात यावी, शहरातील अतिक्रमण हटविण्यात यावे, खांबतलाव परिसरातील वस्ती, सांडपाण्याची व्यवस्था, दूषित पाणी, कचरा व्यवस्थापन, घंटागाडीची नियमितता, रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याची व्यवस्था, डास व्यवस्थापन, बगीच्यांचे सौंदर्यीकरण करण्यात यावे अशी मागणी महेंद्र निंबार्ते यांनी केली आहे. यावेळी नगराध्यक्ष बाबुराव बागडे, नगरसेवक शमीम शेख उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)