शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
3
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
4
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
5
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
9
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
10
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
11
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
12
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
13
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
14
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
15
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
16
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
17
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
18
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
19
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाळी: भाजप, काँग्रेसकडून बी फॉर्मचे वाटप; तीन-चार दिवसांत उमेदवारही ठरणार
20
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ

दशा-दिशा बदलविण्याचे कार्य समाजकर्त्यांनी करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 22:04 IST

समाज परिवर्तनशील असायला पाहिजे. दशा-दिशा बदलविण्याचे कार्य समाजकर्त्यांनी करावे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांंच्या मते समाज संघटित असला की, अन्यायाला प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण होते.

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : ठाणा पेट्रोलपंप येथे तेली समाज बांधवांचा मेळावा उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : समाज परिवर्तनशील असायला पाहिजे. दशा-दिशा बदलविण्याचे कार्य समाजकर्त्यांनी करावे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांंच्या मते समाज संघटित असला की, अन्यायाला प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण होते. त्यामुळे समाज मजबूत होतो. यासाठी आईने केलेल्या कार्याची चिंतन- मनन करुन तिचे ऋण फोडण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.श्री संत जगनाडे महाराज तेली समाज संघटना ठाणा पेट्रोलपंपद्वारे मधुबन सभागृहात तेली समाजबांधव मेळावा, आध्यात्मिक प्रवचन, उपवधु-वर परिचय व समाज प्रबोधन व समाज प्रबोधन मेळाव्याचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री बंडुभाऊ सावरबांधे होते. यावेळी माजी आमदार आनंदराव वंजारी, जिल्हा परिषद नागपूरचे अध्यक्ष निशा सावरकर, तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीदास लांजेवार, विदर्भ तेली समाज संघटना अध्यक्ष धनंजय देविदास लांजेवार, विदर्भ तेली समाज संघटना अध्यक्ष धनंजय खोब्रागडे, राजेश पिसे, राजहंस वाडीभस्मे, सुभाष वाडीभस्मे, चंद्रेशखर गिरडे, माजी सरपंच कल्पना निमकर, पोलीस पाटील अशोक बालपांडे, तारांचद हटवार, निता आकरे, श्रीहरी जौंजाळ, प्रेमलाल लांजेवार, अभिजित वंजारी, गोरखनाथ किरपाण उपस्थित होते.बंडुभाऊ सावरबांधे म्हणाले, समाजातील दिशाहिन बांधवांना संघटनेद्वारे दिशा दाखवून आर्थिक, सामाजिक व बौध्दीक विचाराचे बाळकडू देवून भरिव विकास साधावे तरच समाजाची प्रगती शक्य होईल.तत्पूर्वी सकाळी दत्त मंदिर ठाणा पेट्रोलपंप येथून संताजी जगनाडे महाराज यांची तैलचित्र, ग्रंथाची पालखी काढण्यात आली. संताजीच्या जय जयकाराने ठाणा नगरी दुमदुमली. राष्टÑीय महामार्ग गांधी वार्ड, जुना ठाणा हनुमान वार्ड मार्गे मधुबन सभागृह येथे पालखी यात्राचे विसर्जन करण्यात आले. तद्नंतर उपवर-वधु परिचय मेळावा घेण्यात आला. दिवंगत रमेश चोपकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्पर्धा परिक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांना स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. संचालन व आभार संघटना सचिव इंद्रजीत कुर्झेकर यांनी केले.मेळाव्यासाठी प्रशांत बालपांडे, महेश पडोळे, पुरुषोत्तम कांबळे, कंठीराम दंडारे, किशोर दंडारे, भास्कर वाडीभस्मे, सुरेश बावनकुळे, सुभाष मलेवार, संजय पडोळे, रविंद्र बावनकुळे आदींनी सहकार्य केले.