शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकासाठी विद्यार्थ्यांचे साकडे

By admin | Updated: November 27, 2014 23:28 IST

येथील जकातदार विद्यालयात मागील पाच महिन्यांपासून इयत्ता नववी व दहावी वर्गाच्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषय शिकविण्यासाठी नियमितरित्या शिक्षक नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

भंडारा : येथील जकातदार विद्यालयात मागील पाच महिन्यांपासून इयत्ता नववी व दहावी वर्गाच्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषय शिकविण्यासाठी नियमितरित्या शिक्षक नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याकडे वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे व शिक्षकाची नियुक्ती करावी अशी मागणी येथील विद्यार्थ्यांनी केली आहे.माहितीनुसार मागील सत्रात येथे विज्ञान विषयाच्या शिक्षकाची बदली झाली. त्यानंतर या ठिकाणी विज्ञान शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली नाही. तात्पुरत्या स्वरुपात एका शिक्षिकेची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे नियमितरित्या वर्ग झाले नाहीत. त्यामुळे जुलै महिन्यापासून विज्ञान विषयासंदर्भात विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन हव्या त्या प्रमाणात झालेले नाही. विज्ञान विषय पुरेशा प्रमाणात न शिकविता प्रथम सत्रांत परीक्षा दिवाळीपूर्वी घेण्यात आली. शाळेत विज्ञान विषयाचे शिक्षक नसल्यामुळे सत्रांत परीक्षेतील पेपर अजूनपावतो तपासणी करून परत मिळालेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे टेंशन बळावले आहे. या संदर्भात त्यांनी वारंवार शाळेचे मुख्याध्यापक तथा अन्य शिक्षकांना माहिती दिली. मात्र शिक्षण विभागामार्फत शिक्षकाची सोय करण्यात आली नाही. त्याचा फटका येथील नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना बसत आहे. दहावीचे वर्ष हे टर्निंग पॉइंट म्हणून एका दृष्टीकोणातून बघितले जाते. विज्ञान विषयासारख्या महत्वपूर्ण विषयासाठी शिक्षक नसणे ही बाब विद्यार्थ्यांसाठी गंभीर बनली आहे. विशेष म्हणजे शिक्षक नसल्यामुळे दहाव्या वर्गातील काही विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत विज्ञान विषयातच नापास झाले असल्याची विद्यार्थ्यांमध्ये चर्चा आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांनी आता महत्वाची भूमिका वठविण्याचा निर्णय घेतला आहे. वारंवार कळवूनही शिक्षण विभाग या गंभीर विषयाकडे गांभीर्याने बघत नाही काय? असा सवाल येथील विद्यार्थ्यांनी केली आहे. शिक्षकासाठी विद्यार्थ्यांची विणवणी कायम असून याकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी गांभीर्याने बघणे गरजेचे बनले आहे. (प्रतिनिधी)