शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

रेतीघाटावर कंत्राटदारांना मोकळे रान

By admin | Updated: February 24, 2017 00:34 IST

चारगाव देव्हाडी रेती घाटातून नियमबाह्य रेती उत्खनन सर्रास सुरू आहे. महसूल कंत्राटदार तथा खनिकर्म विभागाचे

चारगाव येथील प्रकार : महसूल खनिकर्म विभागाचे दुर्लक्षतुमसर : चारगाव देव्हाडी रेती घाटातून नियमबाह्य रेती उत्खनन सर्रास सुरू आहे. महसूल कंत्राटदार तथा खनिकर्म विभागाचे संगनमतामुळे लाखोंचा महसूल येथे बुडत आहे. वैनगंगा नदीच्या चारगाव देव्हाडी रेती घाट उच्च दर्जाच्या रेती करिता प्रसिद्ध आहे. या रेतीघाटाचा तीन ते चार कोटीत महसूल विभागाने लिलाव केला. तुमसर-भंडारा-गोंदिया राज्य मार्गाशेजारी हा रेती घाट आहे. चारगाव ते भंडारा असा रस्ता आहे. भंडारा शहराजवळील दाभा येथे हा रस्ता निघतो. आडमार्गाने येथे रेतीची वाहतूक करण्यात येते.माडगी-देव्हाडा शिवारातील वैनगंगा नदी पुलावरून चारगाव रेती घाटात दोन जेसीबी व पोकलॅन्ड मशीन रेती उत्खनन करतानी दिसतात. अनेक मोठे अधिकारी व लोकप्रतिनिधी येथून मार्गक्रमण करतात, परंतु त्याकडे सर्रास दुर्लक्ष केल्या जात आहे.चारगाव नदी घाटात सिमांकन केल्याचे दिसत नाही. महसूल विभागाचा किमान एक कर्मचारी मोठ्या नदी घाटावर नियमित कर्तव्यावर ठेवणे आवश्यक आहे. नदीपात्र विस्तीर्ण आहे. घाटाच्या सीमा कुठून कुठपर्यंत आहे याची माहिती येथे भेट दिल्यावर कळत नाही. कारवाई होऊ नये म्हणून साळी रेती उत्खनन सुरू करण्यात येते. दुपारनंतर ती बंद होते, पुन्हा दुपारी चार नंतर रेती उत्खनन सुरू करण्यात येते. येथे कंत्राटदाराने स्थानिक एका युवकाला हाताशी घेतले तोच सर्व सांभळीत असल्याची माहिती आहे. महसूल अधिकारी येण्याची खडानखडा माहिती येथे ते येण्यापूर्वीच प्राप्त होते. तुमसर तालुक्यातील प्रत्येक रेतीघाटावर नियमबाह्य यंत्राने रेती उत्खनन सुरू आहे. लिलावात ठळक मोठ्या अक्षरात यंत्राने रेती उत्खननास बंदी असल्याचे महसूल विभाग नमूद करतो, परंतु प्रत्यक्षात मात्र उलटे चित्र रेती घाटावर दिसून येत आहे. यासंदर्भात तहसीलदार डी.टी. सोनवाने यांना सांगितल्यावर मी बघतो एवऐच ते बोलले, कंत्राटदार की रेतीघाट यापैकी कुणाला बघतात हे पाहणे औसुक्याचे येथे ठरणार आहे. (तालुका प्रतिनिधी)