शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शुभमंगल सावधानचा गजर झाला ‘लॉकडाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 05:00 IST

मार्च महिन्यात तर थेट संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले. यापूर्वी लग्न जुळलेल्यांनी एक तर घरगुती पद्धतीने लग्न आटोपले किंवा पुढे ढकलले. मात्र लग्न समारंभामुळे होणारा व्यवहार ठप्प झाला. ग्रामीण भागातील सर्वसाधारण घरचेही लग्न लाखाच्या घरात असते. पत्रिका, कपडे खरेदी, वाजंत्री, किराणा यासह इतर वस्तू खरेदी होतात. परंतु यंदा लग्न सोहळेच नाही तर खरेदीही ठप्प झाली आहे. त्यातच अनेकांचा रोजगारही गेला आहे.

ठळक मुद्देलग्नसोहळे थांबले : आनंदाच्या उत्सवात कोरोनाचे विरजण

राजू बांते।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : उन्हाळ्याची चाहूल लागली की सुरु होतो लग्नसराईचा हंगाम. गावागावांत अन् शहरातही घुमू लागतात शुभमंगल सावधानचा गजर. परंतु यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच कोरोनाचे संकट आले. सर्व लॉकडाऊन झाले. आनंदाच्या उत्सवाला कोरोनाचे ग्रहण लागले. कधी लॉकडाऊन संपते याची विवाह इच्छुकांना प्रतीक्षा लागली आहे.गावखेड्यात मार्च ते जून अखेरपर्यंत लग्नकार्य आयोजित केले जाते. मृग नक्षत्रापूर्वी लग्न आटोपण्याकडे सर्वांचा कल असतो. त्यानंतर लग्नकार्य होत नाही. डिसेंबर, जानेवारीपासून स्थळ शोधण्यास प्रारंभ होतो. पसंती आटोपली की साक्षगंध पार पडतो. त्यानंतर सुरु होते लग्नाच्या खरेदीची गडबड. खरेदी आटोपली की आप्तस्वकीयांना पत्रिका वितरीत करून लग्नाला येण्याचे आग्रहाचे आमंत्रण दिले जाते.यंदा मात्र अशी धामधूम कुठेच दिसत नाही. फेब्रुवारी महिन्यापासूनच कोरोनाचे काळे ढग घोंगावू लागले होते. मार्च महिन्यात तर थेट संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले. यापूर्वी लग्न जुळलेल्यांनी एक तर घरगुती पद्धतीने लग्न आटोपले किंवा पुढे ढकलले. मात्र लग्न समारंभामुळे होणारा व्यवहार ठप्प झाला. ग्रामीण भागातील सर्वसाधारण घरचेही लग्न लाखाच्या घरात असते. पत्रिका, कपडे खरेदी, वाजंत्री, किराणा यासह इतर वस्तू खरेदी होतात. परंतु यंदा लग्न सोहळेच नाही तर खरेदीही ठप्प झाली आहे. त्यातच अनेकांचा रोजगारही गेला आहे.आनंदाच्या सोहळ्यात कोरोनाने विरजण घातले असून विवाहोच्छूक मंडळी आता लॉकडाऊन संपण्याची प्रतीक्षा करीत आहेत. मात्र हा लॉकडाऊन केव्हा संपेल हे कुणीही सांगत नाही. कोरोनाच्या या महासंकटाने सर्वांना हादरवून सोडले असून सर्वच जण आता घराबाहेर पडण्यासाठी उत्सूक झाले आहेत. मात्र सर्वाधिक अडचण होत आहे ती वधू-वर पित्यांची.‘ऐका सत्यनारायणाची कथा’ही थांबलीग्रामीण भागात लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची कथा करण्याची परंपरा आहे. चौरंग, केळीचे खुंट, पाण्याचा कलश, नवग्रहाच्या आणि अष्टदिशांच्या सुपाऱ्या आदीसह प्रसाद अशी सामुग्री तयार करून पूजा केली जाते. ध्वनीक्षेपकावरून ऐका सत्यनारायणाची कथा हे गीत ऐकू येते. मात्र यंदा शुभकार्यच नाही तर सत्यनारायणाची कथा तरी कोण करणार आणि त्यावर अवलंबून असणारे पुरोहितही बेजार झाले आहेत.

टॅग्स :marriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या