शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

झाडीपट्टी रंगभूमीने आता सोशल साईटवर कोरले नाव!

By admin | Updated: November 28, 2015 01:48 IST

झाडीपट्टी रंगभूमीतील नाटक कंपन्यांनी आता फेसबुकसारख्या समाजमाध्यमांवर स्वत:चे फेसबुक खाते उघडून ...

लाखांदूर : झाडीपट्टी रंगभूमीतील नाटक कंपन्यांनी आता फेसबुकसारख्या समाजमाध्यमांवर स्वत:चे फेसबुक खाते उघडून त्यावरुन आपल्या कंपनीतील नाटकांचे पोस्टर आॅनलाईन पोस्ट करीत आहेत. सदर पोस्ट सेकंदात जगाच्या कानाकोपऱ्यात प्रसारित होते. याचाच अर्थ झाडीची नाटक झाडीपट्टीच्या सीमा पार करुन ग्लोबल झाली आहे. यातून नाटक कंपन्यांनी नाटकांचा आॅनलाईन प्रचार व प्रसार करुन झाडीपट्टी रंगभुमीच्या इतिहासात सोनेरी पान लिहिले आहे.कवी कुलगुरु कालिदास यांनी ज्या भूमीचा उल्लेख ‘सौराज्य रम्य’ अशा सार्थ शब्दात केला ती झाडी म्हणजे आजच्या महाराष्ट्रातील अतिपूर्वेचा कोपरा होय. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या चार जिल्ह्यांचा अंतर्भाव झाडीपट्टीत करता येतो. या झाडीच्या पट्टीत बोलली जाणारी बोलीभाषा म्हणजे झाडीबोली. या चार जिल्ह्यांच्या विस्तीर्ण अशा भूभागावर पसरलेल्या हिरव्यागार घनदाट वनराईमुळे हा भाग झाडीपट्टी म्हणून ओळखला जातो.झाडीपट्टी रंगभुमीला १०० पेक्षा जास्त वर्षांची समृद्ध अशी परंपरा आहे. १९ व्या शतकाचा शेवट आणि २० व्या शतकाचा प्रारंभ काळ म्हणजे संशोधनाच्या संक्रमणाचा होता. त्यावेळी झाडीपट्टीच्या प्रदेशात दळणवळणाची आणि मनोरंजनाची आजसारखी अतिवेगवान संपर्काची साधने नव्हती. परिणामी येथील नागरिकांना स्वत:च्या अंगभूत कलाकौशल्यातूनच परस्परांचे मनोरंजन करावे लागत असे. झाडीपट्टीतील खेड्यांमध्ये इंग्रज कालखंडात मालगुजार, जमीनदार, पाटील यांनी दंडार, नाट्य आणि संगीत नाटकांना आश्रय दिला. चांगले कलावंत, संगीतकार, वाद्यवृंदवादक यांना हेरून त्यांना बाहेरून आणून जमीन व घरे दिली. दंडार वा संगीत नाटक यांचे आयोजन पैशाचा विचार न करता फक्त मनोरंजन म्हणून केल्या जात असे. दंडारनाट्यात पौराणिक कथांचे प्रतिबिंब तर नाटक प्राचीन धार्मिक, आध्यात्मिक कथानकांवर आधारित असत. झाडीच्या प्रदेशात गावोगावी होळी, दिवाळी, दसरा सणांना वा विशिष्ट दिनी दंडार व नाटकांचे प्रयोग होत असत. परंतु दंडार व नाटक प्रयोग करायचा असल्यास कथानक, कलाकार, नेपथ्थ, सिनसिनेरी, वाद्यवृंदवादक, पार्श्वगायकाची गरज असते. १०० वर्षांपूर्वी हे सर्वजण एकाच वेळेस, एकाच छताखाली उपलब्ध होणे अशक्यप्राय होते. आजच्यासारखी तेव्हा दळणवळण, संपर्क, प्रचार (पत्रके) साधने नव्हती. गावी आलेले पाहुणेमंडळी स्वगावी गेल्यानंतर पाहिलेल्या दंडार वा नाटकांचे आयोजन करीत म्हणजे प्रेक्षकांकडूनच दंडार, नाटक प्रयोगांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या प्रचार व प्रसार होत असे. (तालुका प्रतिनिधी)