‘हात दाखवा बस थांबवा' योजना कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 06:00 AM2019-11-01T06:00:00+5:302019-11-01T06:00:39+5:30

उद्देश चांगला पण प्रवाश्यांच्या हिताचा व एसटीचा फायद्याचा दिसत नाही. थांब्यावर प्रवासी उभे असले तरी एसटी बस थांबेना, याउलट खाजगी ट्रॅव्हल्स आवाज देवून प्रवाश्यांना बसवून नेताना दिसत असतात. अनेकदा प्रवाशांनी हात दाखवून एसटी बस न थांबल्याची तक्रार नागरिक करतात. मात्र त्यावर खरचं कारवाई होते काय? याचे उत्तर मिळत नाही.

 The 'show off your bus' plan is on paper! | ‘हात दाखवा बस थांबवा' योजना कागदावरच!

‘हात दाखवा बस थांबवा' योजना कागदावरच!

googlenewsNext
ठळक मुद्देथांबा असूनही बस थांबेना : मनमानी कारभारावर हवे अंकुश

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाने खाजगी व अवैध प्रवासी वाहतुकीवर मात करण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या मात्र, त्याची अमलबजावणीच होत नसेल तर? त्या योजना काय कामाच्या ! असा प्रश्न प्रवासी करू लागले आहेत. खाजगी वाहनांमधून होणारी प्रवाश्यांची गर्दी कमी करून एसटी महामंडळाकडे प्रवाश्यांना आकर्षित करून अधिकचे उत्पन्न वाढविण्यासाठी ‘हात दाखवा बस थांबवा’ ही कल्पना अमलात आली.
उद्देश चांगला पण प्रवाश्यांच्या हिताचा व एसटीचा फायद्याचा दिसत नाही. थांब्यावर प्रवासी उभे असले तरी एसटी बस थांबेना, याउलट खाजगी ट्रॅव्हल्स आवाज देवून प्रवाश्यांना बसवून नेताना दिसत असतात.
अनेकदा प्रवाशांनी हात दाखवून एसटी बस न थांबल्याची तक्रार नागरिक करतात. मात्र त्यावर खरचं कारवाई होते काय? याचे उत्तर मिळत नाही. त्यामुळे या मनमानी कारभारावर अंकुश लावणे गरजेचे झाले आहे. या भूमिकेत काही चालक वाहक वागताना दिसून येतात.
याउलट आजही काही बसचालक मात्र बस थांबवून स्वत: चालायच काय, म्हणून विचारताना दिसतात हे अपवादात्मक पाहायला मिळते. प्रवासी हेच परम दैवत मानणाऱ्या एसटीने विविध उपक्रम राबविले आहेत. त्यात हात दाखवा बस थांबवा हा लोकप्रिय उपक्रम आहे. एसटीचा प्रवास सुखीचा प्रवास किंवा प्रवाशांची लोकवाहीनी म्हणून मान्यता प्राप्त एसटी बसला सध्या वाईट दिवस असल्याचे बोलल्या जाते.
मात्र याला मुळ जबाबदार कोण? असा प्रश्नही उपस्थित होतो. प्रवाशांना आजही एसटीचा प्रवास सुरक्षित वाटतो मात्र बसस्थानकावर हात दाखवून बस थांबत नाही. ग्रामीण भागात प्रवास करावा तरी कशाने असा प्रश्न आहे.
अनेकदा सुपर बस थांब्यावर एसटी बसचा थांबा असतांना व बसमध्ये रिकाम्या सिटा असतांना केवळ वाहन चालक मनमर्जीने एसटी बस थांबवत नसल्याची प्रवाश्यांची ओरड कायम आहे. तेव्हा नियम करून किंवा कायदा तयार करून चालणार नाही गरज आहे. काटेकोरपणे अमंलबजावणीची गरज निर्माण झाली आहे.

Web Title:  The 'show off your bus' plan is on paper!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.