बावनथडी धरणात अल्प जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 05:00 AM2020-08-15T05:00:00+5:302020-08-15T05:01:06+5:30

तुमसर तालुक्यात जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात पुरेशी वाढ झाली नाही. मात्र गत पाच दिवसांपासून पाऊस होत असल्याने धरणसाठ्यात १८ टक्क्याने वाढ झाली आहे. सध्या या प्रकल्पात ५३ टक्के पाणी आहे. ८ जुलै रोजी ३०.६ टक्के पाणीसाठा होता.

Short water storage in Bawanthadi dam | बावनथडी धरणात अल्प जलसाठा

बावनथडी धरणात अल्प जलसाठा

googlenewsNext
ठळक मुद्देविसर्ग बंद : ५३ टक्के पाणीसाठा उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरणाºया बावनथडी प्रकल्पात आॅगस्टच्या दुसºया आठवड्यातही अल्प पाणीसाठा आहे. या प्रकल्पात सध्या ५३ टक्के जलसाठा असून रोवणीकरिता पाण्याचा विसर्गही थांबविण्यात आला आहे. जलसाठ्यात वाढ न झाल्यास आगामी रबी हंगामावर त्याचा परिणाम होवू शकतो.
तुमसर तालुक्यात जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात पुरेशी वाढ झाली नाही. मात्र गत पाच दिवसांपासून पाऊस होत असल्याने धरणसाठ्यात १८ टक्क्याने वाढ झाली आहे. सध्या या प्रकल्पात ५३ टक्के पाणी आहे. ८ जुलै रोजी ३०.६ टक्के पाणीसाठा होता.
बावनथडी प्रकल्प महाराष्ट्र व मध्यप्रदेशाचा संयुक्त प्रकल्प आहे. मध्यप्रदेश शासनाने सुमारे दीड महिना या धरणातून पाण्याचा विसर्ग केला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तब्बल २५ दिवस धरणातून पाण्याचा विसर्ग केला. धानपिकाच्या रोवणीसाठी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मात्र गत शनिवारपासून तो बंद करण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस झाल्यास या प्रकल्पाच्या जलपातळीत वाढ होवू शकते. गतवर्षी या प्रकल्पात मुबलक पाणीसाठा होता. मात्र यंदा प्रकल्पात अल्प साठा आहे.

सिंचनासाठी वरदान
बावनथडी प्रकल्पाची निर्मिती शेती सिंचनासाठी करण्यात आली. मध्यप्रदेश व भंडारा जिल्ह्यासाठी हा प्रकल्प वरदान ठरला आहे. खरीप व रबी सिंचनासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी या प्रकल्पाचा उपयोग केला जातो.

बावनथडी प्रकल्पात सध्या ५३ टक्के जलसाठा आहे. पेरणी व रोवणी वाचविण्यासाठी प्रकल्पातील पाणी सोडण्यात आले होते. पानलोट क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
-आर. आर. बडोले,
सहायक अभियंता, तुमसर.

Web Title: Short water storage in Bawanthadi dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.