Shepherd found in trouble with corona infection | कोरोना संसर्गाने मेंढपाळ सापडले अडचणीत

कोरोना संसर्गाने मेंढपाळ सापडले अडचणीत

ठळक मुद्देशासनाकडून मदतीची अनेकांना अपेक्षा


लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादूभार्वामुळे जिल्ह्यातील पशुपालन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी समस्या येत असल्याने हा व्यवसाय अडचणीत आला आहे. शासनाने पशुपालक व्यवसायीकांसह मेंढपाळांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.
आजही भटक्या समाजातील अनेक कुटुंबे पशुपालनाच्या व्यवसायानिमित्ताने भटकंती करीत आहेत. यासाठी अनेक शेतशिवारात फिरताना जनावरांसह कुटुंबाना अनेकदा जीव धोक्यात घालावा लागतो. यावर्षी असणाऱ्या कोरोना सदृश परिस्थितीमुळे अनेकांकडून मदत मिळत नसल्याने मेंढपाळ व्यवसायीकांवर उपासमार करण्याची वेळ आली आहे. शासनाकडून भटक्या समाजासाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र कागदपत्राअभावी अनेकांना या योजनेचा लाभ प्रत्यक्षात मिळत नाही.

भंडारा जिल्ह्यातील पवनी, तुमसर, लाखांदूर परिसरात आजही धनगर समाजाचा मुख्य व्यवसाय पशूपालनच आहे. यासाठी शासनाने पंचायत समिती विभागामार्फत शेळी पालनाची योजना सुरु केली. मात्र भटक्या विमुक्तांना या योजनेचा अद्याप लाभ मिळालेला दिसून येत नाही. मेंढपाळाचे खडतर जीवन असून शासनाने मेंढपाळांसह पशूपालन करणाºया गावापासून दूर राहणाºया या व्यवसायीकांना आर्थिक मदत करण्याची गरज आहे.

जिल्ह्यात शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकऱ्यांनी पशुपालनाचा जोडधंदा सुरु केला आहे. आजही शेणखताला चांगली मागणी आहे. अनेकजण शेतात मेंढाना तसेच गायींना बसवितात. मात्र यावर्षी कोरोना संकटामुळे अनेकांनी याकडे पाठ फिरविली आहे. विविध योजनांमधून पशूपालकांना विविध योजना तयार करण्यात आल्या. मात्र प्रत्यक्षात विविध कागदपत्रांअभावी शासनाच्या योजनांचा पशूपालकांना लाभ मिळत नाही. पशूपालकांना चारा कुटार यासह विविध साहित्य देण्याची गरज आहे.

Web Title: Shepherd found in trouble with corona infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.