शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पोलिसांसमोर रेती तस्करांनी पळविले १९ ट्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 23:29 IST

येथून १० कि.मी. अंतरावर असलेल्या नीलज (फाटा) मार्गावरील एका परिसरात रेती भरलेल्या १९ ट्रक पवनीचे तहसिलदारांनी पकडून पवनी पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर याची पोलिसात तक्रार केली. मात्र पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे सर्वच ट्रकचे चालक ट्रक घेऊन पसार होण्यात यशस्वी झाले.

ठळक मुद्दे५० लाख रूपयांचा महसूल बुडाला : पवनी पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : येथून १० कि.मी. अंतरावर असलेल्या नीलज (फाटा) मार्गावरील एका परिसरात रेती भरलेल्या १९ ट्रक पवनीचे तहसिलदारांनी पकडून पवनी पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर याची पोलिसात तक्रार केली. मात्र पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे सर्वच ट्रकचे चालक ट्रक घेऊन पसार होण्यात यशस्वी झाले. परिणामी पोलिसांच्या चुकीमुळे शासनाच्या लाखे रूपयांचा महसुल बुडाला आहे.१२ जून रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास पवनी तालुक्याच्या सिमेलगत असलेल्या नागपूर जिल्ह्यातील भिवापूरचे तहसीलदार हे गस्तीवर असल्याची माहिती खबऱ्यांकडून रेत तस्करांना मिळाली. त्यामुळे रेतीची अवैध वाहतुक करणारे १९ ट्रक पवनी तालुक्याच्या हद्दीतील निलज येथील एका ढाब्याच्या परिसरात उभे करण्यात आले. त्याचवेळी पवनीचे तहसीलदार गजानन कोकड्डे यांना खबºयाद्वारे नीलज फाट्यावर रेतीने भरलेले १९ ट्रक उभे असल्याची माहिती सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास मिळाली. त्यानंतर कर्मचाºयांना सोबत घेऊन ते घटनास्थळी पोहोचले असता त्यांना हे ट्रक दिसून आले. या ट्रकजवळ एकही चालक अथवा क्लिनर नव्हता. या १९ ट्रकमध्ये असलेली रेती ही अवैधरित्या वाहतूक होत असल्याची खात्री होताच तलाठ्यांना बोलावून पंचनामा करण्यात आला. त्यानंतर तहसीलदार स्वत: घटनास्थळावर असल्याचे माहित होताच पवनी पोलीस घटनास्थळी पोहचले. दरम्यान तहसीलदार व पोलिसांनी रात्री १० वाजतापर्यंत ट्रकजवळ असेपर्यंत ट्रकमालक अथवा चालक फिरकला नाही. त्यामुळे तहसीलदार कोकड्डे यांनी ते १९ रेतीचे ट्रक पोलिसांच्या स्वाधीन करून तहसीलदार कोकड्डे हे स्वत: पवनी पोलीस ठाण्यात जावून लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर ट्रक असलेल्या परिसरात पोलिसांना तैनात करण्यात आले. तरीसुद्धा रेतीची अवैध वाहतूक करणाºयांनी मध्यरात्री हे ट्रक तिथून पळविले. पोलिसांच्या निगराणीत हे ट्रक पसार झालेच कसे? असा प्रश्न पडला आहे.मंगळवारला सायंकाळी पकडलेले ट्रक पोलिसांच्या स्वाधीन केले. या १९ ट्रकमध्ये ९६ ब्रास रेतीची अवैधरित्या वाहतूक करण्यात येत होती. या ट्रकचालकाविरूद्ध दंडाची रक्कम ५० लाखांच्या वर वसुल केल्या गेली असती. मात्र पोलीस पहारा असतानाही सर्वच्या सर्व १९ ट्रक पसार झाले, ही खेदाची बाब असून याबाबतीत जिल्हा प्रशासनाला कळविले आहे.- गजानन कोकड्डे,तहसीलदार, पवनी.या क्रमांकाचे आहेत ट्रकअवैध रेती चोरी प्रकरणातील ट्रकमध्ये एमएच ४० वाय १४२६, एम ४० एके ९३६५, एमएच ३१ सीक्यू ५६७१, एमएच ३१ सीबी ७४७९, एमएच३१ ६४६, एमएच४० एके १४९९, एमएच४० व्हीजी०६४४, एमएच ४० बीजी४९९, एमएच ४९ ऐटी३९५९, एमएच ४०बीजी ९१९५, एमएच ४०एके ४४९९, एमएच ४० वाय ३६६४, एमएच ४०बीजी ०१३२, एमएच ४० बीजी ९१६५, एमएच ४० बीजी ४७९९, एमएच ४० ए के ९१९५, एमएच ४० एन ६२७९, एमएच ४० ए के ४५२५, एमएच ४९ एटी ९१९५ यांचा समावेश आहे. पवनीत तत्कालीन पोलीस निरिक्षक ताजने हे असताना त्यांनी गुन्ह्यावर आळा घातला होता आताचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर चकाटे यांच्या कार्यकाळात गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे.

टॅग्स :sandवाळू