शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या दिवशी सात नामांकन दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 05:00 IST

निवडणुकीसाठी कोणत्याही पक्षाने अद्याप अधिकृत उमेदवारांची घोषणा केली नाही. त्यामुळे सर्वच जण उमेदवारीच्या घोषणेची प्रतीक्षा करीत आहेत. अंतिम दिनांक सोमवार ६ डिसेंबर असल्याने येत्या दोन दिवसात उमेदवारांची घोषणा होईल आणि त्यानंतर नामांकन दाखल करण्यासाठी गर्दी होणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी राजकीय पक्षांची वेट अँड वाॅचची भूमिका आहे. उमेदवारांना अर्ज ऑनलाईन भरायचे आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या नामांकनासाठी गुरुवारी दुसऱ्या दिवशी सात नामांकन दाखल झाले. त्यात जिल्हा परिषदेसाठी चार तर पंचायत समितीसाठी तीन नामांकनाचा समावेश आहे. विशेष म्हणजे पहिल्या दिवशी एकही नामांकन दाखल झाले नव्हते. नामांकनाच्या शेवटच्या दिवशी अर्ज भरणाऱ्यांची गर्दी होण्याची शक्यता आहे.भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ आणि पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. १ डिसेंबर पासून नामांकनाला प्रारंभ झाला असून नामांकन दाखल करण्याचा अंतिम दिनांक ६ डिसेंबर आहे. दुसऱ्या दिवशी भंडारा तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी खमारी आणि धारगाव गटातून प्रत्येकी एक असे दोन अर्ज दाखल झाले तर मोहाडी तालुक्यातील जिल्हा परिषदेसाठी पाचगाव आणि करडी तर पंचायत समितीसाठी खमारी बुज., पाचगाव आणि मोहगाव (देवी) येथे प्रत्येकी एक असे पाच अर्ज दाखल झाले आहेत. तुमसर, साकोली, लाखनी, पवनी आणि लाखांदूरमध्ये दुसऱ्या दिवशी एकही नामांकन दाखल झाले नाही.निवडणुकीसाठी कोणत्याही पक्षाने अद्याप अधिकृत उमेदवारांची घोषणा केली नाही. त्यामुळे सर्वच जण उमेदवारीच्या घोषणेची प्रतीक्षा करीत आहेत. अंतिम दिनांक सोमवार ६ डिसेंबर असल्याने येत्या दोन दिवसात उमेदवारांची घोषणा होईल आणि त्यानंतर नामांकन दाखल करण्यासाठी गर्दी होणार आहे.अर्ज दाखल करण्यासाठी राजकीय पक्षांची वेट अँड वाॅचची भूमिका आहे. उमेदवारांना अर्ज ऑनलाईन भरायचे आहे. त्यातच उमेदवार अद्याप जाहीर झाले नाही. काही पक्षांचे मुलाखतीचे सत्र सुरु आहे. त्यामुळे अखेरच्या दोन दिवसात उमेदवारांची घोषणा होऊन नामांकन दाखल होण्याची शक्यता आहे. तुर्तास तरी सर्वांची वेट अँड वाॅचची भूमिका आहे. सर्वांच्या नजरा आता कुणाला उमेदवारी मिळते याकडे लागले आहे.नगरपंचायतीत दुसऱ्या दिवशीही नामांकन नाही- जिल्ह्यातील मोहाडी, लाखनी आणि लाखांदूर या तीन नगरपंचायतीची निवडणूक होत आहे. नामांकनाला १ डिसेंबरपासून प्रारंभ झाला. परंतु दुसऱ्या दिवशीही एकही नामांकन जिल्ह्यात दाखल झाले नाही. नामांकन दाखल करण्याची अंतिम तिथी ७ डिसेंबर असल्याने शेवटच्या दोन दिवसात येथेही गर्दी होणार आहे.

बंडखोरी टाळण्यासाठी शेवटच्या टप्प्यात घोषणा- जागा एक आणि दावेदार अनेक अशी स्थिती जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आहे. त्यामुळे तिकीट न मिळालेले बंडखोरी करण्याची शक्यता आहे. ही बंडखोरी टाळण्यासाठी शेवटच्या टप्प्यात उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद