चोरट्या माशांची महाराष्ट्रात विक्री
By Admin | Updated: July 25, 2016 00:38 IST2016-07-25T00:38:52+5:302016-07-25T00:38:52+5:30
माशांचा प्रजनन काळात शेजारच्या मध्यप्रदेशात मासेमारीवर बंदी आहे. चोरट्या मागौने मासेमारी करुन ....

चोरट्या माशांची महाराष्ट्रात विक्री
रॅकेट सक्रीय : मध्यप्रदेशात प्रजननकाळात मासेमारीवर बंदी
तुमसर : माशांचा प्रजनन काळात शेजारच्या मध्यप्रदेशात मासेमारीवर बंदी आहे. चोरट्या मागौने मासेमारी करुन ती महाराष्ट्राच्या सीमेत सर्रास विक्री सुरु आहे. राज्यातील कोकण किनारपट्टीसह देशातील काही राज्यात मासे प्रजनन काळात बंद आहे. माशांच्या अधिक उत्पादना करीता ही बंदी सर्वत्र लागु करण्याची रगज आहे.
पावसाळ्यात माशांचा प्रजनन काळ सुरु असतो. मादी माशात लाखोंच्या संख्येत अंडी असतात. त्यामुळे मध्यप्रदेशात मासेमारीवर या काळात बंदी आहे. राज्यात कोकण किनारपट्टीवर अशी बंदी घालण्यात आली आहे. तुमसर तालुक्याच्या सीमा मध्यप्रदेशाला भिडल्या आहेत. तिथे चोरट्या मार्गाने मासेमारी करुन ती मासे तुमसर तालुक्याच्या सीमावर्ती भागात विक्री केली जात आहे. या हंगामात मोठ्या प्रमाणात मासे मिळतात. ही मासे नागपूर येथे ही नेली जात आहेत. बावनथडी नदी, बावनथडी धरण परिसर, मध्यप्रदेशाच्या सीमेतील तलाव येथे मोठ्या प्रमाणात मासेमारी सध्या सुरु आहे.
मध्यप्रदेशातील मोठे व्यापारी लहान मासेमाराकडून ही मासे कमी किंमतीत घेतात. पुढे हे मोठे व्यापारी महाराष्ट्रातील सीमावर्ती गावातील बजारात तथा सरळ नागपूरकडे रवाना करीत आहेत. सिमावर्ती गावात लहान मासेमार स्वस्तात मासे विक्री करीत आहेत. त्यामूळे येथील खवय्यांची चांदी आहे.
महाराष्ट्र व मध्यप्रदेशांच्या सिमेत सहज प्रवेश करता येते. तशी सक्षम यंत्रणा नाही. मासेमार सहज नदीपलीकडून राज्य मार्गाने प्रवेश करतात. कारवाई केली पाहिजे. यातही प्रशासन येथे अनभिज्ञ आहे. जिल्हाधिकारी यांनी येथे लक्ष देण्याची गरज आहे.
मध्यप्रदेशातील मोठ्या प्रमाणात मासे महाराष्ट्रातील शहरात विक्री केली जात आहेत. ती मात्र स्थानिक मासेमार स्वस्तात विक्री करीत नाही. त्यामुळे मोठा नफा येथे कमविला जात आहे. काही मासे खाणे येथे धोकादायकही आहेत.
लहान डबक्यात मासे पकडण्याकरिता रासायनिक द्रव्यांचा वापर करतात. अशी माहिती आहे. रासायनिक द्रव्यामुळे मासे मृत्यूमुखी पडतात. अशी मृत मासेही बाजारात आणली जात आहेत. त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)
राज्यात सागरी किनारपट्टीसह देशात काही राज्यात प्रजनन काळात बंदी आहे. उर्वरित महाराष्ट्रात बंदी आणण्यापूर्वी कोळी बांधवांना उदरनिर्वाहाकरिता शासनाने धान्य व इतर मदत केली पाहिजे. तेव्हाच मासेमारीवर बंदी आणावी. प्रजनन काळात मासेमारी केल्याने माशांचे निश्चितच प्रमाण कमी होते. पुढील काळात भरपूर मासे मिळून कोळी बांधवांनी लाभ होईल. याकरिता जनजागृतीची गरज आहे.
- सजंय केवट, संचालक राष्ट्रीय मत्सजिवी सरकारी संघ, नवी दिल्ली.