विद्यार्थी ऑनलाईन प्रवेशासाठी शाळा सरसावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 05:00 AM2020-04-15T05:00:00+5:302020-04-15T05:00:30+5:30

तालुक्यातील ७० शाळांनी विद्यार्थी प्रवेश लिंक तयार केली असून इतर शाळाही लिंक तयार करीत आहेत. सध्याच्या बिकट परिस्थितीत ही लिंक संजीवनी ठरत आहे. सदर लिंक तयार करण्याच्या उपक्रमाचे जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी कौतूक केले आहे. तुमसर तालुक्याच्या या उपक्रमाची दखल घेत जिल्ह्यातील इतर शाळांनी प्रवेशाचे गुगुल लिंक तयार केली आहे.

Schools move for students online admission | विद्यार्थी ऑनलाईन प्रवेशासाठी शाळा सरसावल्या

विद्यार्थी ऑनलाईन प्रवेशासाठी शाळा सरसावल्या

Next
ठळक मुद्देकोरोना संकटात उपक्रम : तुमसर तालुक्यात ७० शाळांची लिंक तयार

मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधामुळे सर्वत्र लॉकडाऊन असून शाळाही बंद आहेत. परंतु आगामी शैक्षणिक सत्रात विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया रखडू नये म्हणून प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करण्यासाठी तुमसर तालुक्यातील शाळा सरसावल्या आहेत. सध्या ७० शाळांची लिंक तयार करण्यात आली असून जिल्ह्यातील शाळाही आता ऑनलाईन प्रवेश उपक्रम राबविणार आहेत.
कोरोना संसर्गाचा फैलाव होवू नये म्हणून लॉकडाऊन घोषीत करण्यात आला. शालेय परीक्षा रद्द झाल्याने मे महिन्यात विद्यार्थी शाळेत येणार नाहीत. १२ मे पर्यंत यापूर्वी शाळा सुरु होत्या. प्रवेशाकरिता विद्यार्थी व शिक्षक भटकत होते. पुढेही परिस्थिती राहणार नाही व वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून तुमसर तालुक्यातील शाळांना विद्यार्थी प्रवेश लिंक तयार करण्याचे निर्देश दिले. शिक्षण विभागाच्या या उपक्रमाला मुख्याध्यापकांनी मोठा प्रतिसाद दिला.
तालुक्यातील ७० शाळांनी विद्यार्थी प्रवेश लिंक तयार केली असून इतर शाळाही लिंक तयार करीत आहेत. सध्याच्या बिकट परिस्थितीत ही लिंक संजीवनी ठरत आहे. सदर लिंक तयार करण्याच्या उपक्रमाचे जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी कौतूक केले आहे. तुमसर तालुक्याच्या या उपक्रमाची दखल घेत जिल्ह्यातील इतर शाळांनी प्रवेशाचे गुगुल लिंक तयार केली आहे. आता ग्रामीण भागातील शाळाही ऑनलाईन प्रवेश देणार असून विद्यार्थी व पालकांना मात्र सुरुवातीला अडचणींचा सामना करावा लागेल.

प्रवेशित लिंक सर्वांना पाठविणार
प्रवेश लिंक शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे पालक, नातेवाईक नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त अध्यक्ष, पंचायत समिती अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, क्रीडा मंडळ, ग्रामसेवक, प्रतिष्ठीत नागरिक आदींना पाठविण्यात येणार आहेत. शाळांनी ई मेल तयार करण्यासाठी ई मेल आयडी दिला आहे. शाळेत विद्यार्थ्यांचा किती प्रवेश झाला हे दिसणार आहे. ३० एप्रिलपर्यंत ऑनलाईन प्रवेश किती झाले याची माहिती तुमसर पंचायत समितीला कळविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कोरोना संकटात शैक्षणिक बदल होणे गरजेचे आहे. विद्यार्थी, शिक्षक, पालकांची सुरक्षितता होणार आहे. वर्क फॉर्म होम संकल्पना येथे करण्याचा प्रयत्न आहे. तुमसर तालुक्यातील मुख्याध्यापकांचा याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातही या उपक्रमाची दखल घेतली.
-विजय आदमने, गटशिक्षणाधिकारी, तुमसर.

Web Title: Schools move for students online admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.