शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

आॅटोचालक संजय मृत्यूनंतर ठरला ‘दृष्टिदाता’

By admin | Published: May 16, 2017 12:25 AM

नेत्रदान हे फार मोठे सामाजिक कार्य आहे. एका माणसाने नेत्रदान केले तर दोन आंधळ्या माणसांना दृष्टी मिळू शकते.

कुटुंबांनी केले नेत्रदान : अल्पशा आजाराने मृत्यूलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नेत्रदान हे फार मोठे सामाजिक कार्य आहे. एका माणसाने नेत्रदान केले तर दोन आंधळ्या माणसांना दृष्टी मिळू शकते. भारतामध्ये अंदाजे कोट्यवधी माणसे आंधळी आहेत. पैकी ६० टक्के बारा वषार्खालील मुले आहेत. रोज हजारो माणसे कोणत्या ना कोणत्या कारणाने मरतात. पण त्यापैकी फक्त काहीजण नेत्रदान करतात. अशाच एका आॅटोचालकाच्या मृत्यूपश्चात त्यांच्या कुटुंबीयांनी नेत्रदान करून त्यांना नेत्ररूपी जिवंत ठेवले आहे.संजय श्रीराम बांते असे मृत आॅटो चालकाचे नाव आहे. भंडारा शहरातील शितला माता मंदिरजवळील बजरंग चौकात राहणारे व्यवसायाने आॅटोचालक होते. त्यांचा पत्नी आशा व १२ वर्षाची श्रेया व १० वर्षाची रिया असा संसार होता. शहरातील प्रवाशांना त्यांच्या ठिकाणी ने-आण करणाऱ्या संजयने व्यवसायातून अनेकांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले. कुटुंबाचा गाडा सुरूळीत सुरू असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. अल्पआजारात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे हातावर आणुन पानावर खाणाऱ्या कुटुंबासमोर मोठे संकट उभे ठाकले. संजयच्या आकस्मिक मृत्यूने पत्नी व मुलींनी हंबरडा फोडला. धकाधकीचे जीवन जगणाऱ्या बांते कुटुंबावर तर आभाळ कोसळले. या दु:खातून सावरण्यासाठी पत्नीला आप्तस्वकीयांनी त्यांना धीर दिला. संजय अचानक सर्वांना सोडून निघून गेल्याने तो नेत्ररूपी जीवंत रहावा व त्याच्या डोळ्यांनी अंधत्व आलेल्यांना जग बघता यावे, यासाठी कुटुंबीयांनी संजयचे नेत्रदान करण्याचा संकल्प केला. त्यानुसार नेत्रपेढीशी संपर्क साधून संजयची नेत्रदान प्रक्रिया पार पाडली. वेगवेगळ्या कारणांमुळे अंधत्व येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मधुमेह हे त्यातील एक प्रमुख कारण आहे. या पाश्वभूमीवर नेत्रदानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शहारत वर्षाला हजारोंचा मृत्यू होतो. मात्र, त्यात बोटावर मोजण्याइतक्याच व्यक्तींचे नेत्रदान होते. अशास्थितीत आॅटोचालक म्हणून प्रवाशांसाठी दिवसरात्र एक करून चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या संजयच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबांनी घेतलेला नेत्रदानाचा पुढाकार सर्वांसमोर आदर्शवत ठरला आहे.अर्ज भरला नसला तरी नेत्रदानमरणोत्तर नेत्रदानाचा अर्ज भरला असेल तरच नेत्रदान करता येते आणि तसा अर्ज भरला नसेल तर नेत्रदान करता येत नाही, असा एक मोठा गैरसमज लोकांमध्ये पसरला असल्याकडेही ते लक्ष वेधतात. खरे तर तसे काहीही नाही. एखाद्या व्यक्तीने मरणोत्तर नेत्रदानाचा अर्ज भरला नसला तरीही त्याच्या मृत्यूनंतर जवळच्या नातेवाईकांनी ठरविले तर ते जवळच्या नेत्रपेढीला नुसता एक दूरध्वनी करून मृत व्यक्तीचे नेत्रदान करू शकतात.