शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

चुल्हाडजवळ रेतीचे डम्पिंग यार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 05:00 IST

रेतीघाटातून केलेल्या उपस्यातून चुल्हाड गावात ठिकठिकाणी रेतीचे डम्पिंग यार्ड तयार करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. नदीकाठावरील मांडवी गावाच्या हद्दीत असणाºया रेतीघाटातून दिवसरात्र रेतीचा उपसा सुरु आहे. त्यामुळे परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. या घाटावरील रेती लिलावात काढण्यात येत नाही.

ठळक मुद्देरेतीचा दिवसभर उपसा : रेतीमाफियांचा मोर्चा मांडवी रेती घाटाकडे

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : वैनगंगा नदीकाठावरील मांडवी गावच्या हद्दीत असणाऱ्या रेतीघाटातून काही दिवसापासून रेतीचा प्रचंड उपसा सुरु आहे. रेतीघाटातून केलेल्या उपस्यातून चुल्हाड गावात ठिकठिकाणी रेतीचे डम्पिंग यार्ड तयार करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. नदीकाठावरील मांडवी गावाच्या हद्दीत असणाºया रेतीघाटातून दिवसरात्र रेतीचा उपसा सुरु आहे. त्यामुळे परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. या घाटावरील रेती लिलावात काढण्यात येत नाही.मात्र रेतीचा सुरु असलेल्या उपस्याकडे खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. या रेतीघाटावरील रेती उपसाकरिता रेतीतस्करांना सोयीस्कर ठरत आहे. या घाटाशेजारी वनविभागाचे झुडुपी जंगल जागेत रेतीचे डम्पिंग यार्ड तयार करण्यात येत आहे.वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी पोहोचण्यापूर्वीच डम्पिंग यार्ड रिकामे करण्यात येतात. दिवसरात्र होणाºया रेतीउपस्यावर प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.वनविभागाने रेतीघाट बंद करण्यासाठी नाली खोदकाम करण्याची गरज आहे. गावाच्या हद्दीतून उपसा करण्यात आलेली रेती चार किमी अंतरावरील चुल्हाड गावाच्या आडोशाला डम्पिंग करण्यात येत आहे.पिपरी चुन्ही आणि चुल्हाड गावाला जोडणाऱ्या मार्गावर डम्पिंग तयार करण्यात आले आहे. या डम्पिंगमधील विक्री तिरोडा शहरात करण्यात येत असल्याची माहिती आहे. चुल्हाड गाव शिवारात असणारा डम्पिंग यार्ड सहजरित्या कुणाच्याही निदर्शनास येत नाही.छुप्या जागेत रेतीचा डम्पिंग यार्ड तयार करण्यात आला आहे. या रेती तस्करीमध्ये चुल्हाड पिपरी चुन्ही येथल रेती माफीयांचा सहभाग आहे. दिवसभर रेतीचा उपसा करुन रात्री रेतीची विक्री करण्यात येत असल्याने सकाळी रेतीचे ढिग दिसून येत नाही. पुन्हा दुपारपासून रेतीमाफीया रेती उपसाच्या तयारीला लागतात. प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरुन सदर प्रकार गत काही दिवसांपासून सुरु असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गावातील काही तरुणांना वेगवेगळी आमिषे देवून यामध्ये सहभागी केले जाते.महिलांचाही सहभागमांडवी रेतीघाटावर अनेक रेती माफियांची नजर आहे. तामसवाडी गावच्या रेतीघाटात जागेवरुन वाद झाल्याने रेतीमाफीया नवीन जागेच्या शोधात आहे. यामध्ये अनेक महिलाही सहभागी होत आहेत. यामुळे रेतीतस्करांचे परिसरातील जाळे मजबूत होत असून त्यामुळे गावकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

टॅग्स :sandवाळू