मतदार यादीत एकाच व्यक्तीचे नाव तिनदा ? वास्तव्य एकीकडे,नाव दुसरीकडे; निवडणूक आयोगाचा घोळ पुन्हा आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 18:24 IST2025-10-15T18:19:50+5:302025-10-15T18:24:43+5:30
घोळ संपेना : काँग्रेसह आता भाजपनेही केली तक्रार

Same person's name in voter list three times? Residence on one side, name on the other; Election Commission's confusion comes to light again
लोकमत न्यूज नेटवर्क
घुग्घुस : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घुग्घुस शहरातील प्रारूप मतदारयादी जाहीर झाली. या यादीत एकाच व्यक्तीचे नाव चक्क तीनदा समाविष्ट असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. निवडणूक प्रशासनाने हा घोळ दूर करावा अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजू रेड्डी यांनी दिला आहे.
आगामी निवडणुकीसाठी निवडणूक प्रशासनाकडून मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. घुग्घुस शहरातील प्रारूप मतदारयादी नुकतीच जाहीर झाली. यामध्ये एकाच व्यक्तीचे नाव तीन वेगवेगळ्या आयडी क्रमांकासह सूचित नोंदविण्यात आले, असा आरोप राजू रेड्डी यांनी केला. प्रारूप मतदारयादी तयार करण्याच्या निष्पक्षतेवरही त्यांनी शंका व्यक्त केली. प्रारूप मतदार यादी जाहीर होताच नागरिकांनी प्रशासनाकडे हरकती दाखल करण्याची संख्या वाढली.
परिणामी, हरकती स्वीकारण्याची अंतिम तारीख १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. तीनदा असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मतदारयादीतील घोळ संपविण्यासाठी संपूर्ण मतदारयादीची पुनर्तपासणी करावी, अशी मागणी अध्यक्ष रेड्डी यांनी जिल्हा निवडणूक नोंदविलेली नावे वगळण्यात येणार अधिकाऱ्यांकडे केली आहे.
मतदाराचे वास्तव्य एकीकडे; नाव दुसरीकडे
राजुरा : नगरपरिषद निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या राजुऱ्यातील प्रभागरचनेनुसार प्रारूप मतदारयादीतही घोळ झाला. शहरातील काही नागरिक एका प्रभागात वास्तव्यास असताना त्यांच्या नावांचा समावेश दुसऱ्या प्रभागातील मतदारयादीत झाला, अशी तक्रार राजुरा शहर भाजपने निवडणूक प्रशासनाकडे केली आहे. राजुरा नगरपरिषद क्षेत्रातील प्रारूप मतदारयादी जाहीर झाली. मात्र, अनेकांची नावे वेगवेगळ्या प्रभागांत केली. या प्रकारामुळे मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. हा घोळ दूर झाला नाही तर मतदानाच्या दिवशी तारांबळ उडेल. यातून निवडणुकीची कार्यप्रणालीच वादग्रस्त ठरेल. त्यामुळे मतदारांच्या मूलभूत अधिकाराशी निगडित असलेल्या या गंभीर त्रुटींची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी भाजपचे शहर अध्यक्ष सुरेश रागीट, माजी सभापती राधेश्याम अडानिया, महामंत्री मिलिंद देशकर, भाजयुमोचे शहर अध्यक्ष प्रफुल्ल घोटेकर आदींनी केली आहे.