साकोली शिक्षक परिषद कार्यकारिनी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:29 IST2021-01-09T04:29:27+5:302021-01-09T04:29:27+5:30

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमातून नंदा पाटील कापगते साकोली येथे जिल्हा कार्यवाह अंगेश बेहलपाडे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक सभेचे आयोजन ...

Sakoli Teachers Council Executive Announced | साकोली शिक्षक परिषद कार्यकारिनी जाहीर

साकोली शिक्षक परिषद कार्यकारिनी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमातून नंदा पाटील कापगते साकोली येथे जिल्हा कार्यवाह अंगेश बेहलपाडे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत विचारविनिमय करून कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली.

त्यात अध्यक्ष म्हणून पुरुषोत्तम डोमळे यांची फेरनिवड करण्यात आली. लोकानंद नवखरे यांची एकमताने कार्यवाहपदी नियुक्ती करण्यात आली. या कार्यकारिणीतील उपाध्यक्ष म्हणून घनश्याम संग्रामे, सहकार्यवाह महादेव सोनवाणे, तालुका महिला आघाडी प्रमुख देविता पटले, संघटन मंत्री राजेश कापगते, कोषाध्यक्ष विनायक मारवाडे कार्यालय प्रमुख रामकृष्ण हारगुडे, सदस्य म्हणून माणिक खर्डेकर, पी. पी. बावणे, शेषराव हिवरे, राम-कृष्ण लोहबरे, के. टी. कापगते, वंदना पोहाणे, राघव इसापुरे, ज्योती सीताडे व मार्गदर्शक म्हणून मुख्याध्यापक एस. के. डोहे, पी. ए. म्हस्के, प्रकाश लंजे इत्यादींची कार्यकारिणीत नियुक्ती करण्यात आली. यावेळी जिल्हा महिला आघाडीप्रमुख मनीषा काशीवार, प्रदीप गोमासे डी .एन. लुटे व जिल्हा कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. या नियुक्तीबद्दल सर्वांनी आम. नागो गाणार तसेच के. के. बाजपेयी, जिल्हा कार्यवाह अंगेश बेहलपाडे, जिल्हाध्यक्ष अशोक वैद्य जिल्हा महिला आघाडीप्रमुख दिशा गद्रे यांचे आभार व्यक्त केले आहे.

Web Title: Sakoli Teachers Council Executive Announced