शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
4
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
5
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
6
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
7
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
8
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
9
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
10
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
11
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
12
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
13
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
14
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
15
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
16
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
17
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
18
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
19
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
20
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
Daily Top 2Weekly Top 5

नाग नदीच्या काठावरील ५० गावांत ‘आरओ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2016 00:29 IST

गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाच्या प्रभावक्षेत्रात येणाऱ्या आणि नागपूर शहरातून वाहणाऱ्या नाग नदीच्या काठावरील बहुतांश गावात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : पंचायत विभागाकडून प्रभावित गावांची यादी बनविण्याचे काम सुरूभंडारा : गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाच्या प्रभावक्षेत्रात येणाऱ्या आणि नागपूर शहरातून वाहणाऱ्या नाग नदीच्या काठावरील बहुतांश गावात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. या नदी काठावर वसलेल्या भंडारा जिल्ह्यातील सुमारे ५० गावांमध्ये शुद्ध पेयजलाचा पुरवठा करण्यासाठी आरओ (रिव्हर्स आॅस्मोसिस) प्लाँट लावण्यात येणार आहे. दूषित पाण्याच्या समस्येचा सामना करणाऱ्या या गावात अशा प्रकारचा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी अंतिम निर्णय झालेला नाही. परंतु, जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी अलिकडेच अधिकाऱयंची बैठक बोलावून दूषित पाण्यामुळे प्रभावित गावाच्या पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रत्येक गावात आरओ प्लाँटसारखे उपाययोजना अंमलात आणण्याचे निर्देश दिले आहे. जिल्हाधिकारी डॉ.चौधरी यांच्या निर्देशानंतर, जिल्हा परिषदेचे पंचायत विभाग व ग्रामीण पाणी पुरवठा विभाग ही माहिती गोळा करीत आहेत. सूत्रानुसार, नागनदी काठावरील गावात आरओ प्लाँट बसविण्यात यावे, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका टाकण्यात आली होती. यात नाग नदीवर अवलंबून असलेल्या नळयोजनेच्या माध्यमातून या गावामध्ये दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या मुद्याकडे ध्यानाकर्षण करण्यात आले. १ सप्टेंबर रोजी या विषयावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. अहिरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) एस. एच. आडे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता देशमुख व भूजल सर्व्हेक्षण व विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी दूषित पाणी पुरवठ्यामुळे प्रभावित गावे, गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाचे प्रभावक्षेत्रात येणारी गावे आणि नाग नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या स्वतंत्र नळयोजनेच्या गावाची वेगवेगळी यादी तयार करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत विभाग व ग्रामीण पाणी पुरवठा विभाग ही यादी संकलित करण्यात गुंतले सून हे काम ८ सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. नाग नदीच्या जलप्रदुषणामुळे प्रभावित नळयोजना ठरवून या गावात लोकसंख्येच्या आधारावर विविध क्षमतेचे आरओ प्लाँट लावण्यात येणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)