शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकाअभावी प्रवाशांची हेळसांड

By admin | Updated: July 29, 2014 23:39 IST

राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणादरम्यान मार्गातील अडथळांची तोडफोड करण्यात आली. यात ठाणा येथील बसस्थत्तनकाचा समावेश आहे. बसस्थानकाची तोडफोड झाल्याने येथील कर्मचारी,

जवाहरनगर : राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणादरम्यान मार्गातील अडथळांची तोडफोड करण्यात आली. यात ठाणा येथील बसस्थत्तनकाचा समावेश आहे. बसस्थानकाची तोडफोड झाल्याने येथील कर्मचारी, विद्यार्थी व नागरिकांना गैरसोय निर्माण झाली आहे.मुजबी ते पारडी नाकापर्यंत रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे. या दरम्यान गावातील सांडपाणी वाहुन जाणाऱ्या नाल्या, रस्ते, बसस्थानक, पाणीपुरवठा प्रभावित झालेली आहे. भंडारा व नागपूरकडे जाण्याकरीता ठाणा टी-पार्इंट स्थित जुने बसस्थानक रूंदीकरणादरम्यान तोडण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाच्या नियमानुसार बस स्थानक जंगशन पार्इंटवर न देता गावाच्या बाहेर किंवा जिथे अपघात होण्याची मुळीच शक्यता नाही तिथेच बांधण्यात येतात, असे प्राधीकरणाचे मत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे जुन्या ठाणा बसस्थानका दरम्यान अपघात न होता गावाच्या सिमेवर जास्त प्रमाणात अपघात झालेले आहेत. गावाबाहेर बस स्थानक तयार करणार, आतापर्यंत पारडी ते मुजबीपर्यंत गावाच्या बाहेर बसस्थानक तयार करण्यात आले. मात्र निर्जन स्थळ बस थांबत नाही. परिणामी बसस्थानक धुळखात आहेत. हे स्थळ कायदा व सुव्यवस्था अबादीत राखण्याच्या दृष्टीकोनातून अयोग्य ठरणार आहे. दिवसा व रात्री महिलांना प्रवास करणे कठीण होणार आहे. बस स्थानक ठाणा येथील जुन्या ठिकाणाहून स्थातांतरीत केल्याने कर्मचारी, वरिष्ठ ुअधिकारी, आयुध निर्माणीला भेट देणारे देश विदेशातील व्हिजीटर यांना गैरसोईचे होणार आहे. करीता नागपुरला जाण्याकरीता आयुध निर्माणी परिसर व महामार्गालगत व भंडाऱ्याकडे जाण्याकरीता आयुध निर्माणीच्या सोसायटीच्या जागेलगत तयार करण्यात यावे, यासंबंधी राष्ट्रीय महामार्ग रूंदीकरण करणारे जे.एम.सीचे प्रकल्प निर्माणी भंडाराचे उपमुख्य कामगार कल्याण आयुक्त सी यांनी दि. २२ आॅगस्ट २०१३ रोजीच्या पत्रात नमूद केले होते. याकडे संबंधित कंत्राटदाराने दुर्लक्ष केले. जुन्याच ठिकाणी बसस्थानक व्हावा, अशी परिसरातील तेराही ग्रामपंचायतची मागणी आहे. आजतागायत ठाणा येथे बसस्थानक निवारा नसल्यामुळे पावसात भिजत बसची प्रतिक्षा करावी लागत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची नितांत गरजेचे आहे. (वार्ताहर)