शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जनगणनेच्या प्रारुपावर आक्षेप नोंदवा

By admin | Updated: February 20, 2015 00:28 IST

देशात दर दहा वर्षांनी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि जातनिहाय जनगणना करण्याची तरतूद असतानाही अनुसूचित जाती व जमाती या दोनच प्रवर्गांचा उल्लेख करीत जनगणना केली जाते.

भंडारा : देशात दर दहा वर्षांनी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि जातनिहाय जनगणना करण्याची तरतूद असतानाही अनुसूचित जाती व जमाती या दोनच प्रवर्गांचा उल्लेख करीत जनगणना केली जाते. ओबीसी आणि अन्य जातींचा उल्लेखच त्या प्रपत्रात नसतो. त्यामुळे, देशातील मागास जातींची खरी संख्या समोर येत नसल्याचे सांगत, जनगणनेच्या प्रारूपावर सामान्य लोकांनी आक्षेप नोंदवावे, असे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले. भंडारा येथे आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.यासंदर्भात माहिती देताना खा. पटोले म्हणाले, इंग्रजांची सत्ता असताना १९३१ पर्यंत या देशात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि जातनिहाय जनगणना करण्यात आली. १९४१ मध्ये युद्धामुळे जनगणना झाली नाही. १९५१ पासून भारतात जनगणनेची पद्धत बदलण्यात आली असून, जातीनिहाय जनगणना केली जात नाही. जातनिहाय जनगणना करण्याचे आदेश असतानाही केवळ अनु. जाती व जमातीची तशी गणना केली जात असून, ओबीसी आणि अन्य जातींची मोजणी होत नाही. परिणामी, लोकसंख्येच्या आधारवर त्या त्या जाती प्रवर्गांना आरक्षण व त्यानुसार दिल्या जाणाऱ्या सोयी सवलतींचा लाभ मिळत नाही. अनुसूचित जातींसाठी १३ आणि अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता ७ टक्के आरक्षणाची तरतूद असली तरी, गेल्या अनेक वर्षात या प्रवर्गांची लोकसंख्या प्रचंड वाढल्याने त्यांच्या आरक्षणाचे प्रमाणही वाढणे गरजेचे आहे. ओबीसी आणि अन्य मागास नागरिकांची जातनिहाय जनगणना झाल्यास त्यांनाही वाढीव आरक्षणाचा लाभ मिळून, विकासासाठी अधिक निधी प्राप्त होवू शकतो. २०११ मध्ये झालेल्या जनगणनेवर आक्षेप नोंदविण्यासाठी आता गावात प्रारूप पाठविण्यात आले आहेत. ग्रामसभेत तसे आक्षेप नोंदवायचे असून, जातीनिहाय जनगणना झाली नसल्याने, सर्व लोकांनी आक्षेप नोंदवावे, जनतेचे आक्षेप आल्यानंतरच हा विषय लोकसभेत व्यापकपणे मांडता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (जिल्हा प्रतिनिधी)