जलाशयात बावनथडीचे पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 09:11 PM2019-11-10T21:11:19+5:302019-11-10T21:11:51+5:30

शेतकरी कर्ज बाजारी झाला आहे. गतवर्षी बघेडा व कारली जलाशय अंतर्गत येणाºया गावातील शेतकºयांना ऐन वेळेवर उन्हाळी धान पिकाला पाणी मिळणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे गहू, हरभरा, लाखोरी आदी रबी पिके वेळ निघून गेल्यामुळे लागवड करता आली नाही. हजारो एकर जमीन पडीक राहिल्यामुळे शेतकºयांवर मोठे आर्थिक संकट कोसळले होते.

Release the ground water in the reservoir | जलाशयात बावनथडीचे पाणी सोडा

जलाशयात बावनथडीचे पाणी सोडा

Next
ठळक मुद्देकारली जलाशय : उन्हाळी धान लागवडीसाठी पाणी गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनारा : उन्हाळी धान लागवडीकरिता बावनाथडीच्या पाण्यानी बघेडा व कारली जलाशय भरून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. येत्या आठवडाभरात पाणी मिळणार की नाही, असा प्रश्न पवनारा ग्रामपंचायतीने संबधित विभागाला दिलेल्या निवेदनातून केला आहे.
यावर्षी परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या धानपिकाची अतोनात नुकसान झाली. त्याबरोबर नानाविध किडीच्या आक्रमणामुळे उत्पादनात प्रचंड घट आहे. शेतकरी कर्ज बाजारी झाला आहे. गतवर्षी बघेडा व कारली जलाशय अंतर्गत येणाºया गावातील शेतकºयांना ऐन वेळेवर उन्हाळी धान पिकाला पाणी मिळणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे गहू, हरभरा, लाखोरी आदी रबी पिके वेळ निघून गेल्यामुळे लागवड करता आली नाही. हजारो एकर जमीन पडीक राहिल्यामुळे शेतकºयांवर मोठे आर्थिक संकट कोसळले होते. यंदा गतवर्षीप्रमाणे चूक होता कामा नये, शेतकºयांना स्वत:ला सावरता येईल म्हणून संबधित विभागाला उन्हाळी धान लागवडीसाठी बावनथडीच्या पाण्यानी बघेडा व कारली जलाशय भरून देण्याविषयी मागणी केली आहे. अन्यथा शेतकºयांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. बावनथडी प्रकल्पात ६५ टक्के जिवंत साठा आहे. बघेडा जलाशयात ६ मीटर तर कारलीत ४.५ मीटर पाणी आहे. परंतु बघेडा व कारलीत असलेल्या जिवंत जलसाठ्याने उन्हाळी धान पिकाचे सिंचन होऊ शकत नाही. बावनथडीच्या पाण्यानी दोन वेळेस दोन्ही तलाव भरून द्यावे लागतील. तेव्हाच सर्वांना शेवटपर्यंत सिंचनाचा लाभ मिळेल. पावसाळी धान पीकाचे अतोनात नुकसान झाले. पीक जमीनदोस्त होऊून बºयाच शेतकºयांचे पिकांना लोंबीतच अंकुर आले. त्याच प्रमाणे किडीमुळे उत्पादनात प्रचंड घट आहे. शेतकरी कर्जाच्या खाईत पडलेला आहे. त्यामुळे उन्हाळी धान हंगामाला पाणी मिळाला तर शेतकरी आनंदीत होईल. दोन्ही जलाशात बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी पवनारा, गर्रा, बघेडा, कारली, आसलपाणी, मोठागाव, चिचोली आदी गावातील शेतकºयांनी केली आहे.

Web Title: Release the ground water in the reservoir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण