शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL 2026 Playoff Race : स्क्रिप्ट भारी की, मॅच? १६ गुण कमावणाऱ्यांसाठीही पोटात गोळा आणणारा ट्विस्ट
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
7
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
8
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
9
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
11
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
12
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
13
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
14
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
15
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
16
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
17
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
18
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
19
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
20
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 06:00 IST

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत केल्या जाणाऱ्या कृषी विषयक कामांची माहिती जाणून घेण्यात आली. पावसाने झालेले नुकसान, शेतकऱ्याची संख्या आणि प्रत्यक्ष मदत मिळालेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी जाणून घेताना ज्यांना मदत पोहचली नाही, त्याच्या कारणामीमांसा करुन तत्काळ मदत मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत, असे निर्देशही खासदारांनी यावेळी दिले.

ठळक मुद्देसुनील मेंढे : कृषी विभागाच्या कामांचा घेतला आढावा, सहसंचालक रवींद्र भोसले यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या कृषी विभागाशी संबंधित योजना शेतकऱ्यांना आणि पर्यायाने ग्रामीण अर्थव्यवस्थेला सुदृढ करणाऱ्या असतात. त्या लोकांपर्यंत पोहचविण्याचे यंत्रणा म्हणून आपले कर्तव्य आहे. अनेकदा योजनांची अमलबजावणी होत असल्याचे कागदावर दिसत असते. परंतु योजनांच्या माध्यमातून झालेल्या कामांचे मुल्यमापन होणेही तेवढेच गरजेचे आहे. असे झाल्यास खऱ्या अर्थाने लाभ दिल्याचे समाधान आपल्याला मिळू शकेल, असे प्रतिपादन खासदार सुनील मेंढे यांनी केले.
भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील कृषी विभागाच्या गत दोन वर्षांतील कामांचा आढावा घेण्याच्या दृष्टीने एका बैठकीचे आयोजन भंडारा येथे करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नागपूर विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा कृषी अधिक्षक हिंदूराव चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, सेवानिवृत्त कृषी अधिकारी तायडे, तंत्र अधिकारी शांतीलाल गायधने, शेतकरी संजय एकापूरे, सुधीर धकाते, राजेश गायधने आदी उपस्थित होते.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत केल्या जाणाऱ्या कृषी विषयक कामांची माहिती जाणून घेण्यात आली. पावसाने झालेले नुकसान, शेतकऱ्याची संख्या आणि प्रत्यक्ष मदत मिळालेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी जाणून घेताना ज्यांना मदत पोहचली नाही, त्याच्या कारणामीमांसा करुन तत्काळ मदत मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत, असे निर्देशही खासदारांनी यावेळी दिले.
धानपिक प्रमुख असले तरी नगदी पिकाकडे शेतकरी कसा वळेल, या दृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे. यासाठी यंत्रणा म्हणून प्रत्येक अधिकाºयाने पुढाकार घेण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना नवीन आणि त्याच्या फायद्याचे जे जे देता येईल, ते देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

दोन वर्षांतील कामांचा घेतला आढावा
केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या सर्व कृषीशी संबंधित योजनांचा आढावा यावेळी खासदारांनी घेतला. दोन्ही आर्थिक वर्षात आलेल्या योजना आणि त्याची झालेली अमलबजावणी या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यात आली. फळबाग, पीक प्रात्याक्षिक, अन्न सुरक्षा, कृषी निविष्ठा वितरण अशा योजनांची माहिती घेतानाच रासायनिक खतांच्या पुरवठाचा आढावा खासदारांनी घेतला.

टॅग्स :agricultureशेती